नाशिक: प्रतिनिधी
दि.२५: नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ॲड. ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देऊन ढिकले कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.