इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१३ मे २०२६ :फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९७.३४ % ,बारावी कॉमर्स विभागाचा ९६.९१ % व आर्ट्स विभागाचा ९१.१५ % निकालासहित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .
इयत्ता दहावीच्या बारा विद्यार्थिनींनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत, तसेच उरणे शरयू राजेंद्र हिने ९७.६० % गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. वाटेगावकर अनन्या अजय ९६.०० % द्वितीय व काकडे वृद्धी विजय ९५.८० % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे .त्याचबरोबर कुमारी शरयू राजेंद्र उरणे हिने संस्कृत मध्ये 100 व कुमारी प्रांजली प्रताप जामदार हिने गणितामध्ये १०० गुण मिळवून बोर्डात या विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
बारावी कॉमर्स विभागात पाटील श्रेया भीमगोंडा हिने ८३.१७%, नदाफ आलिशा जावेद हिने ७९.८३ % , हसुरे स्नेहल उदय हिने ७९.८३ %, मिस्त्री अलमास सुलेमान हिने ७९.१७ % इतके गुण मिळवून या विद्यार्थिनी गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.आर्ट्स विभागात व्हकळे गायत्री सिद्दू हिने ८१.६७ % ,ढोकळे साक्षी सचिन हिने ८०.१७ % व कांबळे अक्षरा संतोष हिने ७९.१७ % गुण प्राप्त करून या विद्यार्थिनी गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत .
सर्व यशस्वी विद्यार्थिनींना श्री. ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवासजी बोहरा शेठजी ,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांचे प्रोत्साहन, त्याचबरोबर प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस. काजी , उपमुख्याध्यापिका व्ही.एस. लोटके ,पर्यवेक्षक एस. एस. कोळी, पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे , उपप्राचार्य व्हि. जी. पंतोजी आणि प्रशालेतील सर्व शिक्षक बंधुभगिनींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे