दहावी निकालात चाटे शिक्षण समूहाची उज्ज्वल कामगिरी

तीन विद्यार्थिनींना १०० टक्के गुण; १९२३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

कोल्हापूर :प्रतिनिधी 

दि.१५: दहावी परीक्षेच्या निकालात चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील चाटे क्लासेस व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
या परीक्षेत चाटे समूहाच्या तब्बल १९२३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. तर समृद्धी बोळाज, स्नेहल टोम्पे आणि समृद्धी पवार या विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले.या यशाबद्दल चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या नियोजनबद्ध अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे आणि प्रा. डॉ. भारत खराटे यांचे मार्गदर्शन लाभले. निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.