इचलकरंजी शहराच्या स्वागत कमानीस हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या!

-शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि.१८: हातकणंगले, कोरोची मार्गे इचलकरंजी शहरामध्ये येताना पंचरत्न मंगल कार्यालयसमोरील स्वागत कमानीस “हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार” असे नामकरण करुन त्याचे यथोचित सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्यासह शिष्टमंडळाने इचलकरंजीचे महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेते व आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील व नगरसेवक सयाजी चव्हाण यांच्या माध्यमातून येणाऱ्या महासभेस सदरचा विषय घेऊन त्यास तात्काळ मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला! याप्रसंगी महापौर उदयजी धातुंडे यांनी निवेदन स्वीकारुन सदरचा विषय सकारात्मक घेऊन लवकरच यास मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले.
२०२६-२७ हे वर्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, इचलकरंजी शहराच्या स्वागत कमानीस. बाळासाहेब ठाकरेयांचे नाव देऊन साहेबांना वेगळ्या प्रकारे मानवंदना देऊया व अभिवादन करुया असे मत शिवसैनिकांनी मांडले
यावेळी मा. उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, मा.शहरप्रमुख धनाजी मोरे, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, नगरसेवक सयाजी चव्हाण, मा.नगरसेवक मनोज भाट, महिला आघाडी उप जिल्हासंघटिका मंगलताई मुसळे, स्नेहल मस्के, लक्ष्मी बुरले, मधुमती खराडे, युवासेना शहरप्रमुख सागर जाधव, शहरसमन्वयक रतन वाझे, विजय जोशी, दत्ता साळोखे, बसय्या स्वामी, भरत शिवलिंगे, राजेंद्र मोकाशी, अजय घाडगे, सुनिल अथने, उमेश पाटील, अरविंद मस्के,दादा पारखे, अविनाश धुळुगडे, गणेश जंगटे, गणेश शर्मा, संतोष लवटे, शितल मगदूम, जोहेब हलगले, दीपक नरदेकर, सागर सातपुते, मारुती बन्ने , दिलीप कोरवी, दिलीप पुरोहित, विक्रम पुरोहित, हर्षद बैरागदार, सुनिल कांबळे, पवन मेटे, ओम बागडे, सागर पाटील, विनायक पाटील, बाबासाहेब जाधव, चेतन आगलावे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.