इचलकरंजी : संजय आंबे
दि20 नोव्हेंबर गेले अनेक दिवस एस टी कर्मचारी सरकारमध्ये विलीनीकरणा बाबत सापावर गेले आहेत. एस टी हि महाराष्ट्रची रक्तवाहिनी आहे. एस टी चे एक लाख कर्मचारी असलेली हि संस्था आज जर्जर झाली आहे. एस टी कर्मचार्यांच्या व एस टी च्या दुर्दशेला महाविकास आघाडी जबादार आहे.अनेक कर्मचारी कमी वेतन व आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केलेले आहेत. एस टी कर्मचार्यांच्या सरकारमध्ये विलीनीकरण व मृत कर्मचार्यांच्या कुटुंबाल भरीव मदत या मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत.पण या सरकारला त्याचाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्याचे लक्ष वसुलीवर आहे. त्यामुळे आज एस टी ची हि अवस्था झाली आहे. पण सरकार त्यांच्या बरोबर चर्चा करायचे सोडून कर्मचारी यांचे निलंबन करणे, पोलीस बळाचा वापर करणे, फुट पाडणे इत्यादि मार्गाचा अवलंब करत संप चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे.देवेंद्र फडवीस सरकारच्या काळातही एस टी कर्मचारी यांनी आंदोलन झाले होते.त्यावेळी सरकारने त्याची दखल घेऊन चर्चा करून प्रश्न सोडविला होता.पण हे सरकार गर्वष्ट असुन कामगारंचे कोणतेही प्रश्न सोडविण्याची मानसिकता दिसत नाही. पण इचलकरंजी भाजप हे खपवून घेणार नाही. भारतीय जनात पार्टी पूर्ण पणे ताकतीने कर्मचार्यांच्या पाठीशी उभी आहे.असे शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या यांनी संगितले .
यावेळी सरचिटणीस अरविंद शर्मा ,अमर कांबळे ,महिल अध्यक्षा सौ.पुनम जाधव , महिल जिल्हा उपाध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे ,उत्तम कुंभार , प्रदीप माळगे , सचिन मासळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.