इचलकरंजी: विजय मकोटे
दि १८ नोव्हेंबरः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील अंजली बच्चाव, शशांक शुक्ला, शुभानी शिंदे यांची सीजीएम गु्रप, दक्षिण आफ्रिका येथे व बसवराज मिठारी यांची स्टँडर्ड कारपेट, दुबई येथील कंपनीमध्ये निवड झाली आहे. याआधिही डीकेटीईमधून १०५ हून अधिक विद्यार्थी परदेशातील मस्ट कॉर्पोरेशन (हॉगकाँग), सीजीएम (द.अफ्रिका), स्टॅण्डर्ड कार्पेट (दुबई), थाई अंबिका केमिकल (थायलंड), नॉईज जीन्स (बांग्लादेश), स्पाईका (व्हीएतनाम), पर्ल ग्लोबल (बांग्लादेश) व एसआरएफ (दुबई) येथे भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. डीकेटीईचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी व कंपन्या यांच्याशी असलेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी शिकत असतानाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्यांना नोकरीची संधी प्राप्त होत आहे.
सीजीएम गु्रप ही आंतरराष्ट्रीय दक्षिण खंडातील सर्वात मोठा डेनिम उत्पादक आहे. या कंपनीची जवळ-जवळ पाच लक्ष युनिटस प्रति महिना एवढी उत्पादन क्षमता आहे. कंपनीमध्ये कटींग आणि शिवणकामाबरोबरच वेट आणि ड्राय प्रोसेसिंग, एम्ब्रॉयडरी, वेस्ट वॉटर प्रक्रिया, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट फॅसिलिटी इत्यादी सुविधा आहेत. स्टॅडर्ड कारपेट ही दुबई मधील कारपेट तयार करणारी नामांकीत कंपनी आहे. कंपनीमध्ये वैविध्यपूर्ण कारपेटस तसेच कृत्रिम ग्रास (Grass) उत्पादन घेतले जाते.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठवण्यामागे डीकेटीई ही संस्था देशात आघाडीवर आहे. या वर्षी कोरोनाच्या संकट काळात देखील ऑनलाईन माध्यमाव्दारे ट्रेनिंग देण्याचे कार्य पूर्ण केले. व्दितीय वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी विविध स्पधार्ंंचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर सॉफ्ट स्कील उपक्रम राबविला जातो. या अंतर्गत कम्युनिकेशन स्कील, लॉजिकल थिंकीग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ग्रुप डिस्कशन, मॅनेजमेंट टेक्निकस अशा विविध विषयांचे कौशल्य तज्ञ मार्गदर्शकाव्दारे दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांची प्रि-प्लेसमेंट टेस्टव्दारे इंटरव्हयूची तयारीही करुन घेतली जाते. अशाप्रकारे सर्वांगीण तयारी करुन घेतल्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याचे देखील परदेशात जावून आपले स्वप्न साकार करण्यासाठी सिध्द होतात.
डीकेटीईच्या प्राध्यापकांची अनुभव संपन्नता अद्ययावत मशिनरी, सुसज्ज प्रयोगशाळा, अधुनिक ग्रंथालय याच बरोबर ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा.संजय अकिवाटे यांचे अथक परिश्रमामुळे टेक्स्टाईल विभागाचे १०० टक्के प्लेसमेंट होत आहे. या यशाबददल डीकेटीईचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.