शिरोळ:राम आवळे
दि.५: शिरोळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 8 जून रोजी पदग्रहण सोहळा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जयसिंगपूर कॉलेज येथील भिर्डी सभागृहात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे यांनी दिली आहे.
श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना चौगुले, पंचायत समिती सदस्या सौ. दिपाली होगले, सौ. निलम म्हेत्रे, जयसिंगपूर नगर परिषदेचे पक्षप्रतोद संजय पाटील कोथळीकर, कुरुंदवाड नगर परिषदेचे पक्षप्रतोद प्रदीप चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. शिरोळ तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही दरगू गावडे यांनी केले आहे.