जुन्या वादातून महिलांसह तिघींना मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि.२६ : गणेशनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून महिलांसह तिघींना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शाहूपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अनिता बाबासाहेब गायकवाड (वय ५० , रा. गणेशनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता सावंत नरळे, अजय सावंत नरळे, अनिकेत सावंत नरळे, प्रिती अजय नरळे व यशश्री अनिकेत नरळे (सर्व रा. गणेशनगर, चांगदेव पाटील चौक, इचलकरंजी) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. २३  जून) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील सचिन कॉर्नर परिसरात ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे असून, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने फिर्यादी अनिता गायकवाड, अर्चना गणेश गायकवाड व रोहिणी अविनाश चंदनशिव यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहिते करीत आहेत.