मालेवाडा येथे संविधान दिन साजरा

 

भिवापूर , नागपूर :नंददत्त डेकाटे 

दि२६ नोव्हेंबर :भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. बळीराजा शेती समुह गट व उच्च प्राथमिक शाळा व चंद्रमणी बौद्ध विहार व बौद्ध पंचकमेटी यांनी संविधान दिनाचे आयोजन केले होते. संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी हातात झाडू घेऊन गावात स्वच्छता केली. आणि वारकरी संप्रदायातील भजन रैली अनेक लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. 

भाषण स्पर्धा करण्यात घेण्यात आली. सांस्कृतिक नृत्य सादर केले व प्रथम व द्वितीय व तृतीय भाषण स्पर्धकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वसंचालन प्रा. शिला रोडो मॅडम यांनी केले तर तर प्रास्ताविक मनोहर वानखेडे केले व मुख्याध्यापक वासुदेव खोंडे यांनी आभार मानले.