इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२६ जुलै २०२६ : पत्नीसोबतचे खासगी क्षणांचे छायाचित्रण मोबाईलमधून चोरून ते प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अव्युक्त सदाशिव गोंधळी (वय ३०, रा. नारायण नगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर ऊर्फ बबलू विलास शिंदे (रा. नारायण नगर, इचलकरंजी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरातील बेडरूमजवळ आरोपीने फिर्यादीच्या नकळत त्याच्या मोबाईलमधील फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे खासगी स्वरूपाचे छायाचित्रण मिळवून त्याचा गैरवापर केला. या प्रकारामुळे फिर्यादीच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.