भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयामध्ये “संविधान दिवस” साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे

   दि 27 नोव्हेंबर भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयामध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिवस निमित्त भाजपा उपाध्यक्ष अॅड.भरत जोशी व विकास बनसोडे यांच्या हस्ते संविधान प्रतिमा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या, भाजपा ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजु, सरचिटणीस अमर कांबळे उपस्थित होते.

     15ऑगस्ट 1947 स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंघ,मजबूत ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले. 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय संविधानाची स्थापना केली. जगातील सर्वात मोठी राज्याघटना असलेल्या भारत देशात 26 नोव्हेंबर  1949 पासून राज्यघटना लागु झाली. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे भारतातील सर्व नागरिकांना या संविधानामुळे समानतेचा मुलभूत अधिकार मिळाला. संविधान नसते तर सर्वांना एक समान हक्क मिळाला नसता व हुकुमशाही प्रमाणे आपला देश चालला असता. या संविधानामुळे एक चहा विकणारा सर्वसामान्य माणूस देशाचा पंतप्रधान झाला. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. असे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी आपल्या भाषणात सांगितले. भाजपा ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजु यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी नेहमी सांगत होते की जेवढे महत्व गितेला देतो तेवढेच महत्व संविधानाला देतो. भाजपची पूर्वीपासून मागणी होती की “१ देश में २ संविधान, २ निशाण, २ प्रधान नहीं चलेगा” त्याचाच भाग म्हणुन जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केलेने संपूर्ण भारत देशामध्ये एक देश एक संविधान झाले आहे असे सांगितले. यावेळी अॅड. भरत जोशी यांनी संविधान वाचन केले.

         यावेळी अरुण कुंभार, अरविंद शर्मा, राजाराम पवार, सौ.अश्विनी कुबडगे, आण्णा आवळे, अमित जावळे, प्रदीप माळगे, बाळकृष्ण तोतला, सागर कचरे, म्हाळसाकांत कवडे, उत्तमसिंह चव्हाण, रामसागर पोटे, प्रदीप भंडारे, विश्वनाथ कबाडी, सचिन माळी, सचिन मासाळ, दीपक पाटील, मोहन कुंभार, संतोष शेळके, इलाई नायकवडी, प्रकाश खारगे, मोहन बनसोडे, शुभम बरगे, प्रदीप कांबळे, विजय कांबळे, भानुदास तासगावे, शिवानंद रावळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.