मणेरे शिक्षण संकुलनात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

कबनूर : हबीब शेखदर्जी 

दि.२ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई  बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

        सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शीतलकुमार मणेरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.अनिलकुमार मणेरे, संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे हे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे यांनी जीवन कार्याची माहिती दिली. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  भाषण केले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ. कविता निंबाळकर तर आभार कु. रेश्मा वाकरेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, कॉलेज विभागप्रमुख सौ.दिपाली चौगुले, अकॅडमी विभागप्रमुख श्री.शैलेश कांबळे, बालवाडी विभागप्रमुख सौ.स्वाती ढेकळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.