इचलकरंजी विजय मकोटे
दि 28 नोव्हेंबर भाजपा बरोबर युती करून व आमच्याच मताच्या जोरावर निवडून आलेले काहीजण फक्त आपल्या सव्वांग प्रसिद्धीसाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका करत आहेत. हाळवणकर साहेबंच्यावर बोलून आपण मोठे होवू या भ्रामक अपेक्षेत असलेल्यांना आम्ही भाजपचे कार्यकर्ते सांगू इच्छितो की हाळवणकर यांनी हद्दपार करणाऱ्यांनाच नगरपालिकेतील सत्तेतून आधीच हद्दपार केले आहे व येथुन पुढील कार्यक्रम हा त्यांना नगरपालिकामधूनच हद्दपार करण्याचा आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे केडर बेस कार्यकर्ते असुन आम्ही गेली दोन वर्ष आमचे फक्त संघटन वाढवणे या गोष्टीकडे लक्ष दिले असुन वैयक्तिक कोणावरही टीका-टिप्पणी केलेली नाही. परंतु काही मंडळीना नगरपालिकेच्या सत्तेतून बाहेर काढल्यामुळे निराशापोटी बेताल वक्तव्य करीत आहेत. आम्हाला वारंवार जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, प्रभाग अध्यक्ष ,पन्ना प्रमुख हे खपवून घेणार नाहीत. विरोधकांच्या अशा वक्तव्यामुळे भाजपा कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. व येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही.
मा.आमदार सुरेश हाळवणकर यांनी जर १०७ कोटीचा प्रचंड असा फंड आणला नसता तर हे लोक येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या समोर देखील जायला घाबरले असते हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवतीर्थच्या उद्घाटना नंतर संपूर्ण इचलकरंजी शहर हे भाजपमय झालेले आहे. शहरामध्ये रस्ते, फुटपाथ, गटारी, सी सी टीव्ही कॅमेरा, ओक्सिजन पार्क, बाग, ओपन जिम, एल. ई. डी. लाईट, सहवास कट्टे व आय. जी. एम. इत्यादीचा कायापालट हे हाळवणकर यांच्या प्रयत्नामुळे झालेले आहे. येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडे काहीही मुद्दा नसलेमुळे फक्त मा.आमदार यांचे नाव घेवून आपली दुकानदारी चालवत आहे. पण आसल्या गोष्टीकडे मा.आमदार हाळवणकर ढुंकूनही पहात नाहीत व लक्ष देत नाहीत. पण भाजपा कार्यकर्ते यांनी आता ठरवले आहे साहेबांना यांना डिवचनाऱ्यां करेक्ट कार्यक्रम करू. तसेच टक्केवारी संस्कृतीलाच हद्दपार करू असे पत्रक भाजपा शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांनी काढले.