जिल्हा बँकेसाठी दोन गटातून आमदार प्रकाश आवाडे यांचा अर्ज दाखल

इचलकरंजी: विजय मकोटे

दि29 नोव्हेंबर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी नागरी बँक व पत संस्था आणि कृषी पणन संस्था अशा दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार आवाडे यांच्यासोबत आमदार पी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, सदस्य डॉ. राहुल आवाडे आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणूकीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी तयारी केली असून नागरी बँक व पत संस्था आणि कृषी पणन संस्था या दोन गटातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी आमदार आवाडे यांच्यासोबत अनेक मातब्बर मंडळींसह दोन्ही गटातील ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोरदार शक्तीप्रदर्शन आणि घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून गेला होता.
यावेळी आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष नाना पाटील, इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, राजू मगदूम, अरुण आवळे, सुनिल पाटील, प्रकाशराव सातपुते, जवाहर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, जनता बँकचे व्हा. चेअरमन चंद्रकांत चौगुले, संचालक अशोकराव सौंदत्तीकर, राजेश पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, जवाहर पाटील, सतीश कोष्टी, चंद्रकांत इंगवले, सुकुमार किणींगे, अभय काश्मीरे, आण्णासो गोटखिंडे, दादासो सांगावे, सुभाष गोटखिंडे, हुपरीचे नगरसेवक सुरज बेडगे, प्रकाश जाधव, विलास खानविलकर, शेखर पाटील, महादेव कांबळे, प्रशांत कांबळे, श्रेणिक मगदूम, अमोल नांद्रेकर, नरसिंह पारीक, राहुल घाट, कपिल शेटके, सुहास कांबळे, राजेंद्र बचाटे, तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ठरावधारक पदाधिकारी आणि आवाडे समर्थक उपस्थित होते.