शिवाजी विद्यापीठात विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करावे : माजी मंत्री प्रकाश आवाडे

इचलकरंजी  :हबीब शेखदर्जी 
दि.२० : वीराचार्य कै. बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.कुंभोज येथे विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. आवाडे बोलत होते. आवाडे म्हणाले, कै. बाबासाहेब कुचनुरे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवाजी विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू होणे आवश्यक आहे, असा ठराव आवाडे यांनी मांडला. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावर संशोधन, व्याख्याने, परिसंवाद तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबविता येतील. विद्यापीठ प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहनही आवाडे यांनी केले. यावेळी सर्वच उपस्थित समाज बांधवानी दोन्ही हात उंचावत माजी मंत्री आवाडे यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिले. 
        याप्रसंगी आचार्य श्री चंद्रप्रभसागरजी महाराज,  वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, प्रमुख व्याख्याते इंद्रजीत देशमुख, माजी जि. प. सदस्य प्रवीण यादव, माजी जि. प. अध्यक्ष डी. सी. पाटील माजी सरपंच अनिकेत चौगुले, ग्रामपंचायत सदस्य भरतेश्वर भोकरे, प्रकाश पाटील, समोशरण भोकरे, जैन युवा मंच, वीर सेवादल तसेच सकल दिगंबर जैन समाज बांधव उपस्थित होते.