स्मॅश स्पोर्टस्च्या बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दी 4  डिसेंबर  :  येथील स्मॅश स्पोर्टस् क्लबच्यावतीने नाकोडानगर येथे बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेला  दिमाखात प्रारंभ करण्यात आला. नगरसेवक रविंद्र माने यांच्या हस्ते आणि शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, नगरसेवक रविंद्र लोहार, गौरव लायकर व सुनिल पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 10 संघांनी सहभाग घेतला आहे. रविवार 5 डिसेंबर रोजी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होणार आहेत.
नाकोडानगर येथे होत असलेल्या या बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेत पेरीटस् रायडर्स (नुतन व करण मुथा), सुपर स्वॅगर्स (रौनक सोनी व अमित तोष्णीवाल), उपकार स्पोर्टस् (भरत सालेचा), आझाद परिंदे (जितू छाजेड), प्रसन्ना बॉईज (सुनिल कासलीवाल), राफेल फायटर्स (अभिषेक सोमाणी), टीम 80 (अमित राठोड), सराफ लाईन्स (आदित्य सराफ), एमएस सेव्हनस्टार (सुनिल कोठारी) व अंजना बाईज (नरेंद्र चौधरी) या संघांचा समावेश आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 44444/- व उपविजेत्या संघास 22222/- रुपये रोख असे बक्षिस देण्यात येणार आहेत. संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज) खेळाडूस सायकल बक्षिस ठेवण्यात आली आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स्मॅश स्पोर्टस् क्लबचे आयुब मोमीन यांनी केले. आभार साद मोमीन यांनी मानले. सूत्रसंचालन निखिल बोरा यांनी केले. उद्घाटनप्रसंगी शितल बेडक्याळे, अनिस बागवान, रणजित लायकर, पंकज डंबाळ, हार्दिक राठोड, रुचित बोरा, जलील मोमीन आदींसह स्पोर्टस् क्लबचे पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते. पहिल्या दिवशी अतिशय रंगतदार सामने पाहण्यास मिळाले. सामने पाहणेसाठी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती.