इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१०: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत प्रतिवर्षी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका पातळीवरील (जिल्हास्तर) क्रीडा स्पर्धांची सुरुवात बुद्धिबळ या खेळापासून झाली.
इचलकरंजी नगरीचे महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, समाज कल्याण समिती सभापती रूबेन आवळे, नगरसेवक संतोष शेळके, अमरजीत जाधव, योगेश पाटील, ध्रुवती दळवाई, अविनाश कांबळे, राजू बोंद्रे, सचिन राणे,रूपा बुगड, प्रियांका इंगवले, गटनेते नगरसेवक शिवाजी पाटील, इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील नवाल, सचिव कौशिक मराठे, कार्यकारिणी सदस्य टी. एम. पाटील, व्यंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे, ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रा. शेखर शहा, महापालिकेचे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, क्रीडा पर्यवेक्षक आकाश माने, सचिन खोंद्रे, प्रसाद बडवे, संजय कांबळे, व्यंकटराव हायस्कूलचे पर्यवेक्षक गणेश बरगाले, बुद्धिबळ स्पर्धा प्रमुख बजरंग थोरवत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व बुद्धिबळाची चाल करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. व्यंकटराव हायस्कूलचे पर्यवेक्षक गणेश बरगाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उपायुक्त पल्लवी पाटील यांनी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मोठ्या संख्येने घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महापौर उदय धातुंडे यांनी अध्यक्षीय भाषणात स्वतः खेळाडू असल्याचा उल्लेख करून प्रत्येक खेळातील बारकाव्यांची आपल्याला माहिती असल्याचे सांगितले. महापालिकेने आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. इचलकरंजी नगरी ही ‘क्रीडा नगरी’ म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या वतीने निश्चित प्रयत्न केले जातील, असे अभिवचन त्यांनी दिले.
याप्रसंगी महापालिकेच्या क्रीडा समितीतील डॉ. राहुल कुलकर्णी, श्याम कांबळे, संभाजी बंडगर, शीला माने, अमित कागले व अमित कुंडले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.स्पर्धेसाठी इचलकरंजीतील नामवंत बुद्धिबळ प्रशिक्षक शैलेश होनकट्टी यांचे तांत्रिक सहाय्य लाभत असून, त्यांच्या टीममधील सर्व सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ज्येष्ठ क्रीडा संघटक विजय गुरव, विश्वास माने, क्रीडाशिक्षक विश्वनाथ माळी, सुहास पोवळे, विनायक भोई, तुषार जगताप, गजानन लवटे, संदीप फासे, कृष्णा आडकिल्ला, मोहन काटकर, संदीप हिरेमठ यांच्यासह क्रीडाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार महापालिकेचे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे यांनी मानले.