अतिग्रे, कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१०: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात करून देणारा डिग्री इंजिनिअरिंग व शॉर्ट टर्म कोर्सेसचा ‘प्रारंभ २०२६’ कार्यक्रम संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दुबई येथील सिल्कलँड ग्रुपचे सीओई डॉ. संजय जाधव, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी उपस्थित होते.यावेळी डिग्री इंजिनिअरिंग बेसिक सायन्स विभाग प्रमुख प्रा. शुभांगी महाडिक, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेसचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, ॲडमिशन सेलचे प्रमुख प्रा. नितीन जाधव, कार्यक्रम समन्वयक प्रा. गफूरसो मकानदार, डिग्री आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगचे सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “संस्थेची मूल्ये जपा, आपल्या मातृभूमीवर प्रेम करा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवा,”असे आवाहन केले. शिक्षणासोबत आरोग्याला प्राधान्य देण्याचा सल्ला देताना सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा, आदर्श व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास करा, एका वेळी एका ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक गोष्ट समजून-उमजून करा, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचा शैक्षणिक प्रवास समजावून सांगताना दगड, देव आणि मूर्तिकाराचे उदाहरण देत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. इंजिनिअरिंगच्या चार वर्षांच्या अभ्यासाचे नियोजन, सातत्य, मेहनत आणि पालकांची भूमिका याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. “संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सुमारे २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक घडविणारे मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे कार्य संस्था करीत आहे,” असे त्यांनी सांगितले. सातत्य, कष्ट आणि सकारात्मक दृष्टिकोनातून यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभांगी महाडिक, सूत्रसंचालन डॉ. सचिन कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. गफूरसो मकानदार यांनी मानले.संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.