रोटरी क्लब इचलकरंजी च्या वतीने रोटरी आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि.१२ : येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी च्या वतीने ५  सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयोजित रोटरी आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२६  वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी येथील सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात पाच आदर्श शिक्षकांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय श्री गजानन महाजन (गुरुजी) व रोटरीचे उपप्रांतपाल सौ. यास्मिन मनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत व्यंकटराव हायस्कूल मधील उत्कृष्ट अध्यापन करीत असलेल्या पाच गुणवंत शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांना गौरविण्यात आले. यामध्ये श्री. दत्तानंद बापूसो चौगुले, सौ. जया अशोक कोळी, सौ .प्रमिला रत्नापा कांबळे, सौ .रेखा सचिन कुमार नोरजे व सौ .गीता मायाप्पा घुबडे यांना पाहुण्यांचे हस्ते प्रशस्तीपत्र, शाल ,श्रीफळ ,बुके देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन नेमिनाथ कोथळे सर यांनी केले.पाहुण्या सौ .यास्मिन मनेर यांची ओळख शिवदास कित्तुरे यांनी करून दिली. व्यासपीठावर रोटरी वेल्फेअर ट्रस्टचे चे अध्यक्ष प्रकाश गौड, लिटरसी डायरेक्टर सागर पाटील व्यंकटराव प्रशालेचे अध्यक्ष डॉ. गोविंद ढवळे, सेक्रेटरी श्री .कौशिक मराठे सदस्य श्री. तुकाराम पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे स्वच्छता दूत श्री. गजानन महाजन, गुरुजी यांचा रोटरी क्लब तर्फे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन रोटरी प्रेसिडेंट पंकज कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब तर्फे डेफ खेळाडू पूनम लड्डा हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल चेस चॅम्पियनशिप स्पर्धेकरता निवड झाली आहे. तिला रुपये ५०००/- ची आर्थिक मदत पाहुण्यांचे हस्ते देण्यात आली. यावेळी गौरव प्राप्त शिक्षक श्री. दत्तानंद चौगुले व सौ.जया कोळी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच श्री महाजन गुरुजी, सौ. यास्मिन मनेर , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी कांबळे यांचे मार्गदर्शनपर मनोगते झाली.

कार्यक्रमाचे आभार सेक्रेटरी सुनील यळरुटे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. गौरी कांबळे व सौ विना शिंदे यांनी केले कार्यक्रमा वेळी रोटरीचे सत्यनारायण धूत ,अजित कुरडे, मनीष मुनोत, राजाराम जाधव ,श्रीनिवास दबडे, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.