इचलकरंजी रोटरी क्लब पुरस्कृत विविध इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 

दि.१२: येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कृत इंटरॅक्ट क्लब चा पदग्रहण सोहळा रोटरी श्रीमती सो.रामविलास बाहेती सेवा केंद्र, येथे पार पडला .रोटरी प्रांत ३१७० चे असिस्टंट गव्हर्नर सौ.यास्मिन मणेर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांचे स्वागत व मनोगत रोटरी अध्यक्ष पंकज कोठारी यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमिटी चेअरमन उत्तम रुग्गे यांनी करून फोर वे टेस्टचेवाचन अजित कुरडे यांनी केले .२०२६ -२७  करीता नवीन अध्यक्ष सेक्रेटरी यांचा पदग्रहण सोहळा पाहुण्यांच्या हस्ते झाला .


यामध्ये आंतरभारती विद्यालय- अध्यक्ष तेजस पाटील सेक्रेटरी श्रेयस कोळी. मारवल इंग्लिश स्कूल- -अध्यक्ष सदफ कुरणे ,सेक्रेटरी सोनाक्षी केशर वाणी ,इंदुमती आवाडे मयूर गर्ल स्कूल- अध्यक्ष आदिती पाटील ,सेक्रेटरी श्रेया निर्मळे, शांतिनाथ एज्युकेशन सोसायटी -अध्यक्ष श्रीवर्धन करडे ,सेक्रेटरी ओम संगलगे, आयडियल इंग्लिश स्कूल-अध्यक्ष अंजली नाईक, सेक्रेटरी सुदर्शन करडे , शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल -अध्यक्ष पूर्वा चव्हाण ,सेक्रेटरी मुस्कान पटेल ,अण्णासाहेब नरदे हायस्कूल ,नांदणी -अध्यक्ष रचना चकोते, सेक्रेटरी अभिषेक भकाटे, शिवनेरी हायस्कूल तिळवणी – अध्यक्ष प्रशांत म्हेत्रे ,सेक्रेटरी पूर्वी कांबळे यांना पदभार सोपवण्यात आला .या सर्व इंट्रॅक्ट शाळांना शैक्षणिक साहित्यही देण्यात आले .

कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे सौ. मणेर यांनी विद्यार्थ्यांना पाच सूत्रे सांगितली आपल्या उपक्रमात वृक्षारोपण, समाजसेवा, पर्यावरण, पर्यावरण रक्षण, तसेच आई-वडिलांची व वृद्धांची काळजी घेणे, स्वतःचा विकास करणे, हा इंट्रॅक्ट क्लब चा उद्देश असून त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिका, सकारात्मक रहा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा ,यश तुम्हाला नक्की मिळेल ,असे त्यांनी मार्गदर्शन केले.तेजस पाटील ,सदफ कुरणे, या विद्यार्थ्यांनी व श्री. एस .एस .पाटील सर व सौ. एम.जे. जावीर या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली. आभार प्रदर्शन सेक्रेटरी सुनील यळरूटे यांनी केले. कार्यक्रमावेळी सत्यनारायण धूत ,मुकुंद माळी, डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांच्यासह इंटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी व शिक्षक बहुसंख्येने हजर होते.