महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्ती विसर्जनासाठी ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासियांचा उस्फूर्त प्रतिसाद

आयुक्त पल्लवी पाटील यांनी मानले शहरवासीयांचे आभार

इचलकरंजी: अन्वर मुल्ला 

दि.२३: महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या घरगूती गणेश मूर्ती विसर्जना साठी महानगर पालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करणेसाठी शहापुर खण तसेच शहरातील सर्वच प्रभागामध्ये जवळपास ४६ ठिकाणी सुंदर रित्या फुलांची सजावट केलेले कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंड आणि निर्मांल्य कुंडाची व्यवस्था करणेत आलेली होती. महानगरपालिकेच्या वतीने ठेवणेत आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या सुविधेस इचलकरंजी शहरवासीयांनी उस्फुर्त पणे प्रतिसाद दिला.


महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचेसह अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक्त विद्या कदम, सहा आयुक्त रोशनी गोडे यांनी आज शहरातील विविध ठिकाणच्या कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाना भेट देऊन पाहणी केली. तसेच गणेश विसर्जन सोहळ्यात उस्फुर्त पणे सहभागी होवुन गणेश भक्तांना शुभेछा दिल्या. यावेळी सर्वच ठिकाणी उपस्थित असलेल्या गणेश भक्तांनी गणेश विसर्जनासाठी महानगर पालिकेच्या वतीने केलेल्या शहापूर खण तसेच शहरातील विविध ठिकाणी तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.


आज दिवसभरात इचलकरंजी शहरवासीयांनी जवळपास ८९०० गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन कुंडासह शहापूर खण येथे करून जवळपास १६ टन निर्माल्य जमा करून महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करणेसाठी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. आजच्या या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्या करिता महानगरपालिके कडुन १ क्रेन, २ यांत्रिक बोटी,१ अग्निशमन वाहन, २ रुग्ण वाहिका , १६ आयशर टेंपो, ५ ट्रॅक्टर यासह महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले, सहा आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, संग्राम भोरे, सुरज माळगे, सचिन भुते, विनोद जाधव, संदीप मधाळे, बबन कांबळे, आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचेसह सर्व विभाग प्रमुख , स्वच्छता निरीक्षक , वॉर्ड इन्स्पेक्टर यांचेसह जवळपास ६०० अधिकारी- कर्मचारी ,१५० स्वयंसेवक तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आणि एन.यु.एच.एम. विभागाकडील वैद्यकीय पथक संपूर्ण दिवस कार्यरत होते. त्याचबरोबर प्रत्येक कामात नेहमी सहकार्य करणाऱ्या शहरातील पोलिस बॉईज असोसिएशन इचलकरंजी, आधार रेस्क्यु फौंडेशन इचलकरंजी, वीर रेस्क्यु फोर्स, स्काय रेस्क्यु ॲंड पोलाईट फोर्स इचलकरंजी, वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी यांचे अनमोल सहकार्य लाभले.तसेच महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे या पुर्णवेळ नियंत्रण होते.
महानगरपालिकेकडून करणेत आलेल्या पर्यावरणपुर्वक गणेशोत्सवाच्या या आवाहनाला उस्फुर्तपणे प्रतिसाद देवुन सहकार्य केल्याबद्दल आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहर वासीयांचे आभार व्यक्त केले आहे.