इचलकरंजी श्रीमद वीरशैव कुरूहीनशेट्टी कोष्टी समाजाच्या अध्यक्षपदी अशोक देगावकर व उपाध्यक्षपदी मधुकर पांढरे

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.२३ : श्रीमद वीरशैव कुरूहीनशेट्टी कोष्टी समाजाची सन २०२६-२७ ते २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिन विरोध पार पडली. या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कार्यकारणी मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी या पदाच्या निवडीसाठी सर्व संचालकांची मिटींग बोलविण्यात आली होती. सभा अध्यक्ष म्हणून सतीश सदाशिव कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पार पडले.यावेळी सन २०२६-२७ ते २०३०-३१ या कार्यकालासाठी अध्यक्षपदी अशोक कृष्णा देगावकर व उपाध्यक्षपदी मधुकर महादेव पांढरे यांची बिनविरोध निवड करणेत आली. यानंतर खजिनदार पदी जगदिश रामचंद्र कोष्टी, सेक्रेटरी पदी सूर्यकांत दत्तात्रय रुकडे यांची निवड करणेत आली.

याप्रसंगी संचालक नुतन अध्यक्ष अशोक देगावकर व उपाध्यक्ष मधुकर पांढरे यांनी समाजापुढील असलेले प्रश्न सोडवणे, शिक्षण, आरोग्य, युवकांना प्रोत्साहन देणेसाठी विविध कार्यक्रम आयोजीत करणेत येतील. तसेच सामाजिक एकता वाढविणेसाठी प्रयत्न करणार असलेचे सांगितले. यावेळी नुतन संचालकांनीही आपआपली मनोगते व्यक्त केली.  सभा अध्यक्ष म्हणून सतीश कोष्टी यांनी सर्व नूतन पदाधिकारीचे मनःपूर्वक अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संचालक श्री सुनिल मल्लापा कोष्टी, आनंद प्रभाकर बिडकर, चंद्रकांत शिवलिंग पांढरे, सुनिल बाबुरव कोष्टी, राजकुमार जगन्नाथ देगांवकर, आनंद चंद्रकांत कोकळकी, चंद्रकांत बाळासाहेब कोष्टी, शितल रमाकांत बिडकर, हर्षवर्धन राजेंद्र कोष्टी, सौ.अनिता राजू बिडकर इ. उपस्थित होते.