सामाजिक कार्यकर्त्यां जैतुनबी अथणीकर यांचे निधन.

इचलकरंजी-विजय मकोटे 
दि.23 : येथील सामाजिक व सहकार क्षेत्रातील जाणत्या जेष्ठ कार्यकर्त्यां जैतुनबी इस्माईल अथणीकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले त्या पेठ वडगावचे माजी नगराध्यक्ष अ. हमीद मोमीन यांच्या कन्या होत. अथणीकर या देशातील पहिल्या इचलकरंजी महिला सहकारी बँकेच्या चेअरमन तसेच दीर्घकाळ संचालक होत्या. राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष आणि सेवादलाच्या त्या सक्रिय कार्यकर्त्यां होत्या. त्याच्या मागे दोंन मुले मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे. इचलकरंजीचा राजकीय आणि सामाजिक चालता बोलता इतिहास अशी त्यांची ओळख होती.