सांगली: मयुरी देशपांडे
दि.२३ : कै. गुरुवर्य किरण ऊर्फ नाना सिंहासने यांच्या स्मरणार्थ सांगली येथे आयोजित राज्यस्तरीय कॅडेट व युथ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेला राज्यभरातील सुमारे ४०० खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत विविध वजनगटांतील खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावत उत्कृष्ट कामगिरी केली. सांघिक विजेतेपदाच्या सहा गटांपैकी चार गटांत कोल्हापूर जिल्ह्याने, तर दोन गटांत पुणे जिल्ह्याने बाजी मारली.महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशन आणि सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उत्तर शिवाजीनगर येथील कल्पतरू मंगल कार्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिली कॅडेट (१२ व १४ वर्षांखालील) आणि २१ वी युथ (१७ वर्षांखालील) वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. पूजा विशालदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर महाळस्कर यांच्यासह विविध पदाधिकारी, पंच आणि मान्यवर उपस्थित होते.
सांगलीत प्रथमच एकाच वेळी दोन स्वतंत्र प्लॅटफॉर्मवर स्पर्धा घेण्यात आली. इलेक्ट्रॉनिक डिजिटल स्कोअर बोर्ड, खेळाडूंसाठी निवास व भोजन व्यवस्था, सहभाग प्रमाणपत्रे आणि विजेत्यांसाठी ट्रॉफी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे, जवळपास २६ वर्षांनंतर लहान वयोगटातील राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून राबविण्यात आला.
स्पर्धेत ९ ते १२ वर्षे, १२ ते १४ वर्षे आणि युथ अशा विविध वयोगटांतील मुला-मुलींनी सहभाग घेतला. प्रत्येक वजनगटात खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, पंच आणि प्रशिक्षक यांच्या मुलाखतींचे आयोजन करून नवोदित खेळाडूंना अनुभवाचे मार्गदर्शन देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या पंचांचाही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेत ९ ते १२ वर्षे मुली गटात शुभ्रा गाडे (पुणे), मुलांमध्ये आदित्य सूर्यवंशी (सांगली), १२ ते १४ वर्षे मुली गटात रिया शेख (पुणे), मुलांमध्ये आरुष पवार (कोल्हापूर) यांनी सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टरचा मान मिळविला. युथ मुली गटात नेत्रा भागवत (पुणे), तर युथ मुले गटात पार्थ पाल (ठाणे) यांनी सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टरचा बहुमान पटकावला.
सांघिक विजेतेपदामध्ये ९ ते १२ वर्षे मुली व मुले तसेच १२ ते १४ वर्षे मुली व मुले या चारही गटांत कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला. युथ मुली आणि युथ मुले या दोन्ही गटांत पुणे जिल्ह्याने सांघिक विजेतेपदावर नाव कोरले.
स्पर्धेचे नियोजन मधुरा सिंहासने टोले आणि दत्तात्रय टोले यांनी केले. कै. नाना सिंहासने यांच्या वेटलिफ्टिंग क्षेत्रातील योगदानाला अभिवादन करण्यासाठी आयोजित ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सांगलीच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आयोजन ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
९ ते १२ वर्षे मुली
-
३२ किलो : अनन्या तोडकर (कोल्हापूर), समृद्धी पाटील (सातारा), संस्कृती कदम (सातारा).
-
३६ किलो : सृष्टी गाताडे (कोल्हापूर), प्राजल वनवे (सातारा), अनुष्का सूर्यवंशी (नाशिक).
-
४० किलो : प्रियांका पाटील (सांगली), श्रुती इंगळे (पुणे), प्राची महाजन (जळगाव).
-
४५ किलो : शुभ्रा गाडे (पुणे), अक्षरा माळी (कोल्हापूर), कनक महाजन (जळगाव).
-
४९ किलो : केतकी इकारी (पुणे), स्वरा पट्टेकरी (कोल्हापूर), समीक्षा लवाटे (कोल्हापूर).
-
५३ किलो : अक्षता गोनुगडे (कोल्हापूर), जान्हवी शिंदे (सांगली), शरण्या परदेशी (पुणे).
-
५७ किलो : ईशल सय्यद (ठाणे), सेजल भाल (सातारा).
-
५७ किलोपेक्षा अधिक : प्रिया सोनारे (कोल्हापूर), ओवी सोंडे (उपनगर मुंबई), शर्वरी कुलकर्णी (सांगली).
९ ते १२ वर्षे मुले
-
३६ किलो : आदित्य सूर्यवंशी (सांगली), गणेश आंधळे (नाशिक), भार्गव माळी (कोल्हापूर).
-
४० किलो : मनीष लोणारी (जळगाव), हर्ष मुडी (कोल्हापूर), लोकेश महाजन (जळगाव).
-
४५ किलो : प्रज्वल पुजारी (कोल्हापूर), वरद लांडगे (कोल्हापूर), वियोम मसवकर (ठाणे).
-
५० किलो : आरुष बट्टे (कोल्हापूर), कार्तिक्य करभारी (ठाणे), गौरव सोनवणे (नाशिक).
-
५५ किलो : विघ्नेश शिंदे (पुणे), मनीष शिकलगर (कोल्हापूर), कृष्णा खैरे (पुणे).
-
६० किलो : निरेन सागर (छत्रपती संभाजीनगर), ओजस पोरवंड (पुणे).
-
६५ किलो : गब्बर सिंग (ठाणे).
-
६५ किलोपेक्षा अधिक : नक्ष कवे (ठाणे).
१२ ते १४ वर्षे मुली
-
३६ किलो : सृष्टी गाताडे (कोल्हापूर), त्रिशा काळभोर (पुणे), तनु शिर्के (नाशिक).
-
४० किलो : प्रियांका पुराणिक (पुणे), भार्गवी बेंडले (ठाणे), श्रुती गाताडे (कोल्हापूर).
-
४५ किलो : जान्हवी गाडे (सातारा), अक्षरा माळी (कोल्हापूर), आराध्या पाटील (ठाणे).
-
४९ किलो : रिया शेख (पुणे), ऋतुत्रया धोत्रे (कोल्हापूर), आराध्या होनमोरे (सांगली).
-
५३ किलो : स्नेहा कोरे (कोल्हापूर), शिवांजली घाडगे (सातारा), अलीशा लहाने (पुणे).
-
५७ किलो : नुसरत सय्यद (अहिल्यानगर), स्वरूपा पुजारी (कोल्हापूर), स्नेहा शिवनगी (सांगली).
-
६१ किलो : आदिश्री लोंढे (पुणे), श्रेया जाधव (कोल्हापूर), सिया चुनेकर (उपनगर मुंबई).
-
६१ किलोपेक्षा अधिक : अंबिका बोरुडे (अहिल्यानगर), सौम्या चौहान (ठाणे), अंशिका कुडे (पुणे).
१२ ते १४ वर्षे मुले
-
४० किलो : जीवन कोळी (कोल्हापूर), शरवराज बोरकर (पुणे), कुणाल महाजन (जळगाव).
-
४५ किलो : वेदांत जाधव (सांगली), केदार आप्राध (कोल्हापूर), कृष्णा शिंदे (जळगाव).
-
५० किलो : आरुष पवार (कोल्हापूर), योगेश पवार (नाशिक), वेदांत तायडे (नाशिक).
-
५५ किलो : नागनाथ पारडे (नांदेड), शौर्य कोयगडे (कोल्हापूर), विवेक महाजन (छत्रपती संभाजीनगर).
-
६० किलो : समर्थ राजपूत (कोल्हापूर), तेजस धायतडक (अहिल्यानगर), सौरभ पाटील (सांगली).
-
६५ किलो : साई आहेर (नाशिक), मोहित उणे (छत्रपती संभाजीनगर), अवधूत सांगळे (नाशिक).
-
७० किलो : यश माळी (कोल्हापूर), पृथ्वीराज सोनारे (कोल्हापूर), युवराज थिटे (पुणे).
-
७० किलोपेक्षा अधिक : विघ्नेश सरवतकर (पुणे), नक्श कवे (ठाणे), विनायक चरण (सांगली).
युथ मुली
-
४५ किलो : नेत्रा थोरात (पुणे), श्रावणी कुंभार (कोल्हापूर), श्रेया सोनार (नाशिक).
-
४९ किलो : रिजा शेख (पुणे), निरोजा नलावडे (सातारा), ऋतुत्रया धोत्रे (कोल्हापूर).
-
५३ किलो : झिजो पट्टेकर (कोल्हापूर), श्रुती धायतडक (अहिल्यानगर), वैष्णवी शुक्ला (नाशिक).
-
५७ किलो : अनुष्का पाटील (कोल्हापूर), तनिष्का शिंदे (पुणे), आर्या घोरपडे (पुणे).
-
६१ किलो : निशिगंधा कडोले (एचपीसी), प्रांजल आंधळे (नाशिक), आर्या गायकवाड (पुणे).
-
६९ किलो : रितिका चिंचवाडे (पुणे), साक्षी चौधरी (ठाणे), धनश्री थोरात (सातारा).
-
७७ किलो : आनंदी सांगळे (नाशिक), श्रेया गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), प्रणिती चव्हाण (कोल्हापूर).
-
७७ किलोपेक्षा अधिक : खुशी सकपाळ (एचपीसी), सानवी जोगडे (पुणे), सेजल सकाळे (सांगली).
युथ मुले
-
५५ किलो : अथर्व ढोकटे (सातारा), अवधूत आव्हाड (नाशिक), सुमित तायडे (छत्रपती संभाजीनगर).
-
६० किलो : पार्थ पाल (ठाणे), रोहन भालेराव (जळगाव), पृथ्वीराज मिठारी (कोल्हापूर).
-
६५ किलो : सार्थक इंदुलकर (पुणे), पार्थ शिंदे (कोल्हापूर), सुजल शिवळकर (जळगाव).
-
७० किलो : पोतराम वोड (पुणे), श्रवण अडतराव (लातूर), वैभव पाटील (सांगली).
-
७५ किलो : आदित्य चौधरी (जळगाव), अर्णव चौधरी (ठाणे), तुषार भागवत (कोल्हापूर).
-
८५ किलो : मीत घोडे (ठाणे), श्रेयस सूर्यवंशी (सांगली), शुभम चांदले (जळगाव).
-
९५ किलो : राजस शिंदे (एचपीसी), त्र्यंबक महाडिक (चंद्रपूर), विजय पोमणे (सोलापूर).
-
९५ किलोपेक्षा अधिक : आर्यन वर्कड (पुणे), सुजल धाडंबे (सोलापूर), तुळसीदास मेंगाणे (एचपीसी).
सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर
| गट | खेळाडू | जिल्हा |
|---|---|---|
| ९ ते १२ मुली | शुभ्रा गाडे | पुणे |
| ९ ते १२ मुले | आदित्य सूर्यवंशी | सांगली |
| १२ ते १४ मुली | रिया शेख | पुणे |
| १२ ते १४ मुले | आरुष पवार | कोल्हापूर |
| युथ मुली | नेत्रा भागवत | पुणे |
| युथ मुले | पार्थ पाल | ठाणे |
सांघिक विजेतेपद
| गट | विजेता जिल्हा |
|---|---|
| ९ ते १२ मुली | कोल्हापूर |
| ९ ते १२ मुले | कोल्हापूर |
| १२ ते १४ मुली | कोल्हापूर |
| १२ ते १४ मुले | कोल्हापूर |
| युथ मुली | पुणे |
| युथ मुले | पुणे |