श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

इचलकरंजी : प्रतिनिधी

दि: २६ जानेवारी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. ना. बा. एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त श्री. अहमद मुजावर  यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. शासनाच्या कोरोना प्रतिबंधाच्या नियमाचे पालन करून विद्यार्थिनीच्या अनुपस्थित केवळ शिक्षक व शिक्षकेत्त्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना ना.बा. शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री अहमद मुजावर यांनी अनेक क्रांतीकारकाच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांच्यावर आहे. आदर्श नवतरुण घडवण्याचे काम शिक्षकांचे आहे. राष्ट्रघडवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना,

देशाच्या संविधानाचे महत्व सांगितले. विविधतेने नटलेल्या भारतात राष्ट्रीयत्वाच्या एका धाग्यात बांधून ठेवण्याचे काम भारताच्या राज्यघटनेने केलेले आहे. यावेळी झेंडागीत व राष्ट्रीय प्रेरणागीत प्रशालेच्या संगीत शिक्षिका सौ. रानडे मॅडम आणि विद्यार्थिनींनी गायले. यावेळी उपप्राचार्य श्री. आर. एस. पाटील उपमुख्याध्यापिका सौ एस.एस.भस्मे, पर्यवेक्षक श्री. व्ही. एन. कांबळे, प्रा. शेखर शहा, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.