रत्नागिरी: अस्लम खान
दि. ०६ फेब्रुवारी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसणी येथे कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षिका श्रीमती वर्षा संदेश घाग यांनी सेट परिक्षामधे यश संपादन केले आहे. त्या ‘शिक्षणशास्त्र’ विषय घेऊन सेट उत्तीर्ण केले आहे. श्रीमती वर्षा घाग रत्नागिरी तालुक्यात सेट परीक्षा उत्तीर्ण पहिल्या प्राथमिक शिक्षिका ठरल्या आहेत.
वर्षा घाग यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच स्वतःची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता उंचावत नेली आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात त्यांनी ऑनलाईन शिक्षण प्रत्येक विद्यार्थीपर्यंत पोचावे यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांना अनेक पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.
सेट परीक्षामधे मिळवलेल्या यशाबद्दल जि.प. शाळा बसणीच्या मुख्याध्यापिका, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व सदस्य, गावचे ग्रामस्त, केंद्रप्रमुख, तालुक्यातील शिक्षक बंधु-भगिनी, शिक्षक संघटना पदाधिकारी, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत