कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार
दि .२ मार्च : महावितरण कोल्हापूरच्या ग्रामीण विभाग-२ अंतर्गत तक्रारदाराची ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगच्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालया तील सहाय्यक अभियंत्याला लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवार दि 2 रोजी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार याने महावितरण ग्रामीण विभाग-२ अंतर्गत ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगची कामे केली होती. त्याची बिले मंजूर करण्यासाठी सहाय्यक अभियंता धर्मराज काशीदकर याने तक्रारदारांकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती .त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा लावून धर्मराज काशीदकर याला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.