इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १ एप्रिल राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या शर्वरी माळी हिचा दुसरा क्रमांक* श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या शर्वरी श्याम माळी या विद्यार्थिनीने नुकत्याच डेरवण येथे झालेल्या योगासन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला आहे .पालकांचे प्रोत्साहन व शाळेचे पाठबळ यामुळे तिला हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. *श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री हरीशजी बोहरा , व्हाईस चेअरमन मा. श्री उदयजी लोखंडेसो ट्रेझझर राजगोपालजी डाळ्या, सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडींगेसो स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर यांनी या खेळाडूचे अभिनंदन केले. व संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करून तिला पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या* *श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोंदकर एस. एस. , उपप्राचार्य श्री पाटील आर. एस. , उपमुख्याध्यापिका सौ भस्मे एस.एस. व पर्यवेक्षक श्री कांबळे व्ही. एन यांनी शर्वरी माळी हिचे अभिनंदन केले.* *क्रीडा विभाग प्रमुख श्री शेखर शहा सर व सुहास पोवळे सर यांचे यशस्वी खेळाडूंना विशेष मार्गदर्शन लाभले