कबनूर– चंदुलाल फकीर
दि: २० एप्रिल येथील झेंडा चौकातील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षय गुरव व अजय गुरव यांनी पूजेचे नियोजन केले होते.येथील मारुती मंदिर ट्रस्ट, श्री हनुमान जन्मोत्सव समिती व बजरंग दल यांच्या वतीने जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी रात्री श्री दत्त भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम शनिवारी पहाटे श्री हनुमान देवास महाअभिषेक, पूजा, आरती, जन्मकाळ पुष्पवृष्टी आदी धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर पहाटे सहा वाजून दोन मिनिटांनी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात झाला यानंतर सामुदायिक सहस्त्र नामजप कार्यक्रम झाला महिलांनी पाळणा गीत गायले त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला. जन्मोत्सव वेळी माजी सरपंच मधुकर मणेरे,प्रमोद पाटील, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, प्रकाश इंगवले, दत्ता पाटील,किरण परीट, शंकर सुतार, चंद्रकांत परीट,युवराज कोळी, विजय केटकाळे,संजय लिगाडे,विजय देसाई, शंकर पवार यांचेसह भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीहनुमान जन्मोत्सव निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये जोर मारणे मोठ्या गटात गणेश माळी प्रथम क्रमांक, सागर सावंत याने द्वितीय क्रमांक, ज्ञानेश्वर घोडके याने तृतीय क्रमांक मिळविला जोर मारणे लहान गटात प्रथम क्रमांक सिद्धार्थ महासवे द्वितीय क्रमांक यश सपकाळ तृतीय क्रमांक पृथ्वीराज मगदूम यांनी मिळवले धावणे शर्यतीत प्रथम क्रमांक अक्षय पवार द्वितीय क्रमांक रोहित जाधव व तृतीय क्रमांक ओमकार पन्हाळकर यांनी मिळवले सायकल शर्यतीत प्रथम क्रमांक सचिन देसाई(नांदेड)द्वितीय क्रमांक मयूरपवार(सातारा)तृतीय क्रमांक शुभम भोसले(कोल्हापूर)
श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान मंदिर ट्रस्ट, श्री हनुमान जन्मोत्सव समिती व बजरंग दल यांच्या वतीने शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते .