इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि :२४ : शहापूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना शहापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. जयसिंगपूर ते अंकली टोल नाका परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४३४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती रोहित डावळे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास यड्राव येथील हॉटेल अकॉर्ड इंटरनॅशनल बार अँड रेस्टॉरंट, पार्वती इंडस्ट्रीज इस्टेट परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी हॉटेलचे मॅनेजर अल्बर्ट हरीबेनी अब्रॉस (वय ५३, रा. समता नगर, मिरज) हे काम करीत होते. हॉटेलच्या बाहेर एका महिलेशी वाद झाल्यानंतर आरोपींनी मयतास मारहाण केली. यावेळी आरोपींनी मयताच्या डोक्यात गंभीर दुखापत केल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी प्रसाद सुबण्णा शेट्टी (वय ४८, व्यवसाय हॉटेल, रा. तिरंगा चौक, पुजारी मळा, इचलकरंजी) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर व शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने समांतर तपास करून आरोपींचा शोध घेतला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी गंगा प्रविण पाटील (वय २०, रा. बेघर वसाहत, यड्राव, सध्या रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) आणि आशपाक सिकंदर नदाफ (वय २३, रा. जामा मशीदसमोर, खोतवाडी, ता. हातकणंगले) यांना ताब्यात घेतले.
या कारवाईसाठी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू , अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव तसेच इचलकरंजी विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, मा. पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, मा. पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र लोहार, पोउनि श्री. महावीर कुंटे, पोउनि श्री. कृष्णा दरेकर, पोउनि श्री. जालंदर जाधव, मपोसेई किशोरी साळवे, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, उदय पाटील, संतोष कांबळे, रोहित डावळे, सतीश कुंभार, बबन माळी, अभिजीत कांबळे सर्व शहापूर पोलीस ठाणे तसेच संतोष बर्गे , गजानन गुरव , प्रदीप पाटील, सत्यजीत तानुगडे सर्व नेम स्था. गु. अ. शाखा कोल्हापूर.अंमलदारांनी काम केले.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत. आरोपींविरुद्ध शाहापूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात शहापूर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.