कबनूरमध्ये भगवान महावीर जयंती निमित्य सवाद्य मिरवणूक उत्साहात

कबनूर  :चंदुलाल फकीर

दि: 20 एप्रिल  येथील जैन समाज, शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर, वीर सेवादल व वीर महिला मंडळाच्यावतीने जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव, रथ,पालकी, मिरवणूकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जैन समाजाचे अध्यक्ष संजय लिगाडे यांनी ध्वज पूजन केले, संजय कोले यांनी ध्वजारोहण केले. सौ व श्री रोहित मगदूम यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली.
भगवान महावीरांच्या मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरापासून मिरवणूक निघाली. सकाळी शांतिनाथ जैन मंदिरापासून रतोउत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक झेंडा चौक, रत्नाप्पाण्णा कुंभार चौक, कारखाना रस्त्यावरून सुरेश केटकाळे यांच्या घरासमोर आल्यानंतर तिथे भगवान महावीरांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. तेथून पुन्हा मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक प्रमुख मार्गावरून जैन मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूक मध्ये युवकांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विरसेवा दल कार्यालयाचे उद्घाटन संजय लिगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. जन्मोत्सवानिमित्त आयोजित शिबिरात ६८ जणांनी रक्तदान केले .सायंकाळी अमोल घाटे (हुपरी) यांचे मेरी भावना व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर व्याख्यान झाले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होऊन महोत्सवाची सांगता झाली.भगवान महावीर जयंती करीता कबनूर मधील जैन समाजातील ज्येष्ठ व्यक्ती,युवकांच्यासह महिला मोठ्या संख्येने सर्व कार्यक्रमात सहभागी झाले होते.