इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. २१ एप्रिल दत्ताजीराव कदम ऐ.एस.सी महाविद्यालयात बीएससी भाग 1 मध्ये शिकत असलेल्या अनिकेत माने याने ॲथलंटीक्स मधील उंच उडीमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे भारतीय संघात त्याची निवड झाली आहे त्याने 2.03 मिटर उंच उंच उडी मारली आहे म्हणून त्याची नेताजी सुभाष चंद्र बोस साई भारतीय खेल प्राधिकरण या प्रशिक्षण केंद्रा मध्ये निवड झाली आहे ही निवड चाचणी संपूर्ण भारतातून केली जाते
आत्तापर्यंत अनिकेत नाही 12 वर्ष, 14वर्ष,17 वर्ष,18वर्ष, प्रत्येक वयोगटांमध्ये नॅशनल स्पर्धे मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे गोवा येथे झालेल्या रिलायन्स अथलंटीक्स स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये त्याने ब्राँझ पदक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे अनिकेत हा खेळातच प्रारांगत नसून अभ्यासात खूप हुशार आहे या महाविद्यालयांमध्ये त्याने बी.एस.सी भाग एक मध्ये प्रवेश घेतला आहे विद्यापीठाच्या संघामधून त्याची निवड झाली होती बेंगलोर येथे होणाऱ्या तीन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झालेले आहे तीन वर्षाचे प्रशिक्षण शासनामार्फत दिले जाते अनिकेत माने सोनी अकॅडमी कबनूर येथे सराव करीत आहे त्याचे वडील प्रशिक्षण श्री सुभाष माने हे देत आहेत या खेळाडूला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ . व्हीं. एस ढेकळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले निवड झाल्यानंतर अनिकेत व त्याचे वडील सुभाष माने यांचे महाविद्यालयाच्या मार्फत कौतुक करण्यात आले मा. प्राचार्य व्ही एस ढेकळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याला प्रा. मेजर मोहन विरकर प्रा. मुजफ्फर लगे वाले प्रा. प्रशांत कांबळे श्री जयकुमार करके यांचे मार्गदर्शन लाभले विशेष म्हणजे महाविद्यालयातील सायन्स विभागातील प्रा. घारे प्रा गणबावले डॉ. डी ए यादव प्रा डीसी कांबळे यांनी खेळाडूचे कौतुक केले व पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या