इचलकरंजी: विजय मकोटे
दि.26 एप्रिल : साहित्य आणि भावना यांचे अतूट नाते आहे असे डी के ए एस सी कॉलेजमध्ये जागतिक पुस्तक दिनानिमित्त साहित्याचे महत्त्व विशद करताना प्राचार्य डॉ. ढेकळे यांनी वरील उदगार काढले. जागतिक पुस्तक दिन व प्रथितयश इंग्रजी साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीनिमित्त इंग्रजी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील ग्रंथालयात विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्याचे ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. एस आय नुरानी यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी साहित्य माणसाला जगणे शिकवते, मानसिक बळ देते म्हणून विविध प्रकारचे साहित्य ग्रंथ वाचले पाहिजेत असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनिता वेल्हाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. डी. जी.घोडके यांनी करून दिली. ग्रंथप्रदर्शनामध्ये विल्यम शेक्सपियर यांच्या दोनशेहून अधिक ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ग्रंथालय विभाग प्रमुख श्री व्हीं. पी. यादव, सहा. ग्रंथपाल श्री चव्हाण आर. एस. यांचे सहकार्य लाभले तसेच इंग्रजी विभागातील प्रा. हरगाने एस. एस., प्रा.चेंडके एम.डी., प्रा. नम्रता ताटे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पौर्णिमा स्वामी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. कांबळे डी.सी. मेजर विरकर डॉ. आळवेकर ई.बी., प्रा. हराळे डॉ. बेंद्रे एस. बी., डॉ. शिंदे व्हि.पी., सौ. तराळ इत्यादी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.