जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

कोल्हापूर : प्रतिनिधी

दि. 1 मे :महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, प्रातांधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.