राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई : नासीर शेख 

दि.21 : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

            राज्यपालांचे प्रधान सचिव  संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, तसेच राजभवन येथील पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.

            सुरुवातीला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.