लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल १९ बक्षिसे

कोल्हापूर : प्रतिनिधी

दि. १३ जुलै :नुकताच महाराजा बुके हॉलकोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प्रांतीय बक्षीस वितरण समारंभामध्ये लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल १९ बक्षिसे देऊन सन्मानित केले.

     यामध्येलायन्स क्लब ऑफ इचलकरंजी (बेस्ट क्लब ऑफ डिस्ट्रीक्ट)लक्ष्मिकांत भट्टड (बेस्ट प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट)महेंद्र बालर (बेस्ट ट्रेजरर ऑफ  डिस्ट्रिक्ट  , शैलेंद्र जैन (बेस्ट सेक्रेटरी ऑफ ऑफ डिस्ट्रीक्ट)सौ. स्वाती राठी (डिस्ट्रीक्ट PRO डायरेक्टरी अवार्ड)विजयकुमार राठी (मल्टीपल डिस्ट्रीक्ट अवार्ड)महेश सारडा (बेस्ट झोन चेअरमन ऑफ डिस्ट्रीक्ट)सुरेश पाटील (थॅंक्स फोर डोनेशन टू लायन्स क्लब इंटरनॅशनल फी)तसेच पर्मनंट प्रोजेक्ट क्लब प्लॅटिनम अवॉर्डबेस्ट बॅनर प्रेसेंटेशन गोल्ड अवार्डक्लब सर्कुलर प्लॅटिनम अवॉर्डस्क्रपबुक गोल्ड अवॉर्ड,फोटो कॉन्टेस्ट प्लॅटिनम अवॉर्ड  यांचा समावेश आहे. कनकश्री भट्टड यांना घोसरवाड वृद्धाश्रमातील विशेष कामगिरी व श्रुतिका भंडारी यांना ‌‍हॅ‌‍प्पी स्कूल अंतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय अवार्ड देवून गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा लायन्सचे प्रांतपाल सुनील सुतार यांचे हस्ते झाला.

या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी चे लक्ष्मिकांत भट्टडमहेंद्र बालरशैलेंद्र जैनविजयकुमार राठीकृष्णा भराडीयामहेश सारडासुभाष तोष्णीवालअमित पोद्दारसुरज दुबेविनय महाजनविजयराज जाजू,  नरेंद्र मोदी सौ.स्वाती राठीसौ. कनकश्री भट्टडसौ. कांता बालर व सौ. प्रियांका जैन तसेच इतर लायन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.