रत्नागिरी : अस्लम खान
दि. २९ जुलै : जिल्हातील 14 वर्षां खालील मुले कुणीही शालाबाह्य नसल्याची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा कडक आदेश दिला होता. पण तरीही जिल्ह्यामध्ये शालाबाह्य मुले नसल्याचा डंका पिटला गेला. मात्र 14 वर्षांचा आर्यन परिहार नावाचा मुलगा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामाला जात आहे. शिक्षण विभागाने जे सर्व्हेक्षण केले त्यात जर शाळाबाह्य मुले नसतील तर हा मुलगा शाळाबाह्य कसा राहीला? याचे आत्मचिंतन शिक्षण विभागाला करणे गरजेचे आहे. यावरूनच शालेय बालक कामात आणि शिक्षण अधिकारी गोमात असे दिसतय .

शिक्षण हक्क कायद्यानुसार मुले शाळाबाह्य राहू नयेत यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. पण सर्व गोष्टी कागदोपत्री पूर्ण करण्याच्या नादात कागदावरती ओके पण प्रत्यक्षात मात्र शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरु आहे यावरुन दिसून येते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देवून केवळ 4 हजार रुपयांवर काम करणाऱ्या या मुलाला शिक्षणाचा हक्क मिळवून द्यावा व अशी अनेक मुले शाळाबाह्य असतील तर त्यांचा खऱ्या अर्थाने शोध घेवून बालकांना न्याय मिळवून द्यावा.

कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनाला मेडिकल बिले अनधिकृत कामगिरी यातच जास्त इंटरेस्ट आहे. अशैक्षणिक कामासाठी कोणतीही कामगिरी काढू नये, असे स्पष्ट आदेश असताना एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जवळच्या रिक्त शाळा सोडून शिक्षणाधिकाऱ्यांचा संदर्भ टाकून मोठ्या प्रमाणात अनधिकृत कामगिरी काढण्यात आली आहे. व याबाबतीत प्रशासन मुग गिळून आहे. जर कामगिरी काढायच्याच होत्या तर जवळपास कमी पटाकडून जवळच्या जास्त पटाच्या शाळेवर कामगिरी काढायच्या सोडून अनधिकृत कामगिरी काढण्यात आली आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाली असल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरु आहे.
आतापर्यंत केवळ तालुक्यापर्यंत हे लोन होते मात्र नवीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही कामगिरी काढायची नाही असे सांगितल्याने त्यांचा संदर्भ क्रमांक टाकून 1/7/2022 ला शिक्षणाधिकाऱ्यांनी यादी मंजूर केली. त्यामुळे शिक्षकांनाही डबल आर्थीक भुर्दंड बसल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी भाजपा जिल्हा संघटक राजू भाटलेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे प्रसार माध्यमाना सांगितले.