शालेय बालक कामात व शिक्षण अधिकारी मात्र कोमात
दि. २९ जुलै : जिल्हातील 14 वर्षां खालील मुले कुणीही शालाबाह्य नसल्याची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा कडक आदेश दिला होता. पण तरीही जिल्ह्यामध्ये शालाबाह्य मुले नसल्याचा डंका पिटला गेला. मात्र 14 वर्षांचा आर्यन परिहार नावाचा मुलगा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामाला जात आहे. शिक्षण विभागाने जे सर्व्हेक्षण केले त्यात जर शाळाबाह्य मुले नसतील तर हा मुलगा शाळाबाह्य कसा राहीला? याचे आत्मचिंतन शिक्षण विभागाला करणे गरजेचे आहे. यावरूनच शालेय बालक कामात आणि शिक्षण अधिकारी गोमात असे दिसतय .
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देवून केवळ 4 हजार रुपयांवर काम करणाऱ्या या मुलाला शिक्षणाचा हक्क मिळवून द्यावा व अशी अनेक मुले शाळाबाह्य असतील तर त्यांचा खऱ्या अर्थाने शोध घेवून बालकांना न्याय मिळवून द्यावा.
आतापर्यंत केवळ तालुक्यापर्यंत हे लोन होते मात्र नवीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही कामगिरी काढायची नाही असे सांगितल्याने त्यांचा संदर्भ क्रमांक टाकून 1/7/2022 ला शिक्षणाधिकाऱ्यांनी यादी मंजूर केली. त्यामुळे शिक्षकांनाही डबल आर्थीक भुर्दंड बसल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी भाजपा जिल्हा संघटक राजू भाटलेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे प्रसार माध्यमाना सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.