श्री दत्त (शिरोळ) चा ५५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ

शिरोळ: राम आवळे 

दि.२९ : श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२६-२०२७  या ५५  व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते आज गुरुवारी सकाळी १०.०० वाजतां संपन्न झाला.या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. हा ऊस गाळप हंगाम कारखान्याच्यादृष्टीने अतीशय महत्वाचा आहे. दत्त कारखाना हा आपलाच कारखाना आहे. आम्ही विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करीत आहोत. सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी आमच्या कारखान्याने ठिकठिकाणी मेळावे घेवून सभासदांना मार्गदर्शन केले आहे. आज जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यासाठी आम्ही ऊस विकासाच्या विविध योजना राबवून शास्त्रज्ञांच्यामार्फत सातत्याने सभासदांना मार्गदर्शन केले आहे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. कारखान्याचे सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे कामकाज चालू आहे. ५५ व्या गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे. सर्व सभासदबंधूनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला पाठवावा अशी विनंती त्यांनी शेवटी केली.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती. विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, ॲड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू गोपाळ माने-गावडे, जोतीकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, विजय सुर्यवंशी, महेंद्र बागे, संचालिका सौ. संगिता पाटील कोथळीकर, सौ. अस्मिता पाटील, बाळासाहेब पाटील- हालसवडे, मलकारी तेरदाळे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री, कामगार संचालक प्रदिप बनगे, ऊस तोडणी वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर, जयसिंगपूरचे नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर यांचेसह महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासदबंधू, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कामगार, ऊर्जाकुर श्री दत्त पॉवर कंपनी, कामगार ट्रस्ट, कामगार सोसायटी, कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.