बार्टी पुरस्कृत एम.सी.ई.डी. मार्फत मोफत “हायटेक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामध्ये संपन्न

कोल्हापूर : प्रतिनिधी

दि.२९  जुलै:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर अंतर्गत दोन महिने कालावधीचा नि:शुल्क अनिवासी हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण “आयटी ऑटोमेशन प्रोग्रामिंग आणि बेसिक जपानीज.” संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग साह्य कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग अंतर्गत कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील  इच्छुक युवक युवतीने कडून प्राप्त होणाऱ्या प्रवेश अर्जा मधून दोन महिने कालावधीच्या मोफत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र ३०  उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी अनुसूचित जाती स्वयंसहायता गटातील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने आपले आधार कार्ड,  जातीचे प्रमाणपत्र,  रहिवासी दाखला,  दोन पासपोर्ट साईज फोटो व सर्व शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक ०१ ऑगस्ट 2022  रोजी ठीक ११.०० वा.  उपस्थित राहावे अशी माहिती  कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक, प्रा. अजय बी. कोंगे यांनी प्रसिद्धी पत्रकास दिली आहे.  उच्च दर्जेचा उद्योजकास पूरक  प्रशिक्षण कार्यक्रमास  नव उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा    लाभ घ्यावा असे आव्हान प्राचार्य, प्रा. विराट व्ही. गिरी यांनी केले आहे.
विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत व विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

—