अंगणवाड्यांना ग्रामपंचायत तर्फे गॅस कनेक्शन आणि डिजिटल वजन काटे

रत्नागिरी : अस्लम खान
दि .२९ जुलैै :  कोतवडे गावातील सर्व अंगणवाड्यांना  ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे च्या माध्यमातून  गॅस कनेक्शन व डिजिटल वजन काट्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.    
                 कोतवडे गावामध्ये उंबरवाडी, मुस्लिमवाडी, धामेळेवाडी, वारे- ढोकमळे, गावणवाडी, बाजारपेठ, घारपुरेवाडी, कुंभारवाडा या आठ अंगणवाड्या आहेत.  
                 ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे च्या वतीने पंधरावा वित्त आयोग (महिला व बालकल्याण निधी) अंतर्गत गॅस शेगडी, सिलेंडर, रेगुलेटर ,सुरक्षा पाईप यांचे गुरुवार दिनांक 28 जुलै 2022 रोजी वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील मुलांचे अचुक वजन करण्यासाठी ग्रामपंचायत कोतवडेच्या वतीने डिजिटल वजन काटे देण्यात आले.
ग्रामपंचायत कोतवडे चे सरपंच श्री तुफिल पटेल, उपसरपंच श्री संतोष बारगोडे, ग्रामविकास अधिकारी श्री देविदास इंगळे, ग्रामपंचायत सदस्या सौ पायल पांचाळ, ज्योती मयेकर, सौ दिया कांबळे,सौ चांदबी बारगीर, सौ ज्योती वारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गॅस कनेक्शन व वजन काटे यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ मंजिरी पवार, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडे चे मुख्याध्यापक श्री शिवपूजे सर, प्राथमिक शाळा कुंभारवाडा च्या मुख्याध्यापिका सौ साळवी मॅडम, घारपुरेवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ केळकर मॅडम,  प्राथमिक शाळा उर्दू चे शिक्षक श्री कुरेशी सर, वारे-ढोकमळे प्राथमिक शाळेचे शिक्षक किरण भुवड, तसेच गावातील ग्रामस्थ श्री अश्फाक पटेल, श्री अजय मयेकर, श्री सुरेश भोसले, श्री राजेंद्र कांबळे,श्री अश्फाक बारगीर, श्री जगदीश वारेकर, आशा सेविका सौ लांजेकर , सौ जोगळेकर तसेच सर्व अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
शासनाकडून विद्यार्थ्यांना  मिळत असलेला पोषण आहार शिजवीण्यासाठी अंगणवाडी सेविकांना इंधनाची मोठी समस्या भासत होती. अन्न शिजवण्यासाठी गॅस कनेक्शनची अत्यंत आवश्यकता आहे. ही बाब ग्रामपंचायतने लक्षात घेऊन 15 वित्त आयोग निधीतून तशी तरतूद करून  अंगणवाड्यांची मागणी पूर्ण केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अचूक वजन व्हावे यासाठी ग्रामपंचायत मधून या आठही अंगणवाड्यांना डिजिटल वजन काटांचा पुरवठा करण्यात आला आहे.
गॅस कनेक्शन व डिजिटल वजन काटे या अत्यावश्यक बाबी ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे ने दिल्याबद्दल अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस, पालक वर्ग व ग्रामस्थ यांचं कडून या बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.