इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ३ ऑगस्ट रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने रोटरी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या सायकलींचे गरजू विद्यार्थीनींना वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे अध्यक्ष अशोक जैन व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये कु. भूमिका आनंदा भालेकर (रा. कबनूर) व कु. आदिती उमेश पाटील (इचलकरंजी) यांना सायकली प्रदान करण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये, प्रोबस क्लबच्या कार्याचे कौतुक करत गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य देऊन समाजोपयोगी काम केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रमुख पाहुणे व सर्व सदस्यांचे स्वागत क्लबचे उपाध्यक्ष शिवबसू खोत यांनी केले. प्रास्ताविक क्लबच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता होगाडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख क्लबचे सेक्रेटरी सुनिल कोष्टी यांनी करुन दिली. प्रमुख अतिथी अशोक जैन यांचा सत्कार डी. एम. बिरादार तर अंबरीश सारडा यांचा सत्कार विजय पोवार यांनी व संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचा सत्कार प्रदीप लडगे यांनी केला.
आभार प्रदर्शन क्लबच्या जॉईंट सेक्रेटरी वर्षा कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन क्लबच्या सौ. प्रमोदिनी देशमाने यांनी केले. यावेळी प्रदीप लडगे यांचा वाढदिवसानिमित्त डॉ. कुबेर मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राजन मुठाणे, डॉ. प्रकाश पाटील, दिलीप शेट्टी, सुरेश काजवे, रामचंद्र निमणकर, सौ. मनिषा कोष्टी, सौ. शालिनी जगदाळे, सौ. खुशनुमा ठगरी, सौ. जयश्री पुजारी, सौ. शैलजा सौदीमठ, सौ. ऋतुजा जोशी, सौ. अलका काटकर, कांचन चोथे, अॅड. विश्वास चुडमुंगे, सर्जेराव घोरपडे, जोतिराम जाधव, एम. के कांबळे, हेमंत कवठे, सौ. अरुंधती सातपुते, सौ. शारदा कवठे, काशिनाथ जगदाळे, आप्पासाहेब कुडचे, सुर्यकांत बिडकर, गजानन सुलतानपुरे, प्रकाश अकिवाटे, महावीर कुरुंदवाडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.