शरद पॉलिटेक्ऩिकला आएसटीईकडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड

गोव्यात 27 ऑगष्ट प्रदान : दोन प्राध्यापकांचाही होणार सन्मान

शिरोळ : विजय धंगेकर

दि. 17  ऑगस्ट :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकला नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड जाहिर झाला आहे. त्याचबरोबर शरद पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रीकल विभाग प्रमुख प्रा. चेतन रावळ यांना ‘बेस्ट फॅकल्टी फॉर एक्सलंट कॉन्ट्र्युबिशन इन आएसटीई अॅक्टीव्हीटी’ तर डिन प्रा. प्रविण थोरात यांना ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गोवा येथील अग्नेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाईन कॉलेजमध्ये 27 ऑगष्टला होणा-या 51 व्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (ISTE) राष्ट्रीय अधिवेशनात हा अॅवार्ड देण्यात येणार आहे.

शरद पॉलिटेक्निकने फॅकल्टी डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम, इंडक्शन प्रोग्रॅम, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रोजेक्ट स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, क्युझ कॉम्पीटेशन असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबर प्रा. रावळ यांनी त्यांच्या विभागामध्ये विविध अॅक्टीव्हीटी राबविल्या आहेत. प्रा. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सोलर बेसड व्हॅक्सीन स्टोरेज सिस्टीम’ हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच महाविद्यालयात राबविण्यात येणा-या शरद पॅटर्न, व्हॅल्यू एडेड प्रोग्रॅम, प्रोजेक्ट बेसड लर्निंग, युजी फेलोशिप तसेच इनोव्हेशन सेंटर, शरद स्टार्टअप सेंटर, विद्यार्थी व प्राध्यपकांसाठी सातत्याने अॅक्टीव्हीटीचे आयोजन या सर्वांचे परिक्षण करुन या अवार्डसाठी निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी शरद पॉलिटेक्ऩिकला ‘बेस्ट पॉलिटेक्ऩिक’ व सर्व विभागांना एन.बी.ए. समितीकडून मानांकन मिळाल्याबद्दल ‘एनबीए अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) च्या ह्या अवार्डयाठी निवड म्हणजे शैक्षणिक संस्थेने केलेल्या कार्याचा उचित गौरव असल्याचे मत संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी व्यक्त केले.