इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १८ ऑगस्ट :लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सिटी च्या सन 2022-23 सालचा पदग्रहण समारंभ लायन व्हिजन सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्षपदी कैलाशचंद पुरोहित यांची तर सेक्रेटरीपदी हरीष बेलेकर व खजिनदारपदी डॉ. निलेश पाटील यांची निवड करण्यात आली. नव नियुक्त कार्यकारणीव पीडीजी जगदीश पुरोहित यांनी पदग्रहणाची शपथ दिली. याप्रसंगी रिजन चेअरमन राजेंद्र वडगुले, झोन चेअरमन डॉ. कल्याणी खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नुतन अध्यक्ष कैलाशचंद पुरोहित यांनी, सर्वांच्या सहकार्याने लायन्स क्लब सिटीच्या माध्यमातून वर्षभरात वेगवेगळे प्रोजेक्ट राबविण्याबरोबरच गोरगरीब गरजूंना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी ऑल इंडिया पारिक महासभा नवीदिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर राजेंद्र बोहरा व नरसिह पारीक यांची तर खंडेलवाल समाज महाराष्ट्र प्रदेश युवा संगठनच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश पंडित यांची निवड झाले बद्दल सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष आर. बी. व्यास यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात मागील वर्षांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला.
कार्यक्रमास किरण खोराटे, सुनिल पट्टनशेट्टी, आर. जी. पाटील, रमेश अग्रवाल, रमा बोहरा, दादासो भाटले, शिवराज पाटील, सोहनलाल पारिक, राजेश हुपरे, मधु म्हेतर, सोनाली पेटकर, ओमप्रकाश पारिक, सचिन पारीक आदींसह लायन सदस्य व मान्यवर उपस्थित होते.