इचलकरंजी :लखन जाधव
दि. १० :ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी लाभार्थ्यांची सर्व थकीत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा शासन निर्णय पारीत झाला आहे, अशी माहिती दिली.
इचलकरंजी पात्र असूनही अनुदानापासुन वंचित संजय गांधी निराधार योजनेतील दहा हजार लाभार्थ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. लाभार्थ्यांची सर्व थकीत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा शासन निर्णय पारीत झाला आहे, अशी माहिती आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन महिन्यापूर्वी इचलकरंजीत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा पार पडला होता. त्यावेळी बहुसंख्य लाभार्थ्यांना सदर योजनातील पैसे मिळाले नसल्याचे तसेच काहींचे पैसे शासन स्तरावर थकीत आहेत असे लक्षात आले. ही बाब आपण मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यातील लाभार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. सुमारे 2400 कोटींचा निधी मंजूर केला शासनाच्या या निर्णयामुळे 67 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये *इचलकरंजी शहरातील 10 हजार लाभार्थ्यांचा* समावेश आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे हा निधी सध्या वर्ग करण्यात आला असून त्याचे वाटप दिवाळी पूर्वी करण्यात येणार आहे हे सर्व लाभार्थी दोन वर्षापासून वंचित राहिले होते. संजय गांधी निराधार योजनेसाठी कमिटी गठीत करण्याचे काम सुरू असून ती कमिटी लवकरच अस्तित्वात येईल असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले. दीड ते दोन वर्षांपासून थकीत असणारी संपूर्ण रक्कम लाभार्थ्यांना मिळणार असून दिवाळी पूर्वी ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायलाच पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असणार आहे असेही आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेवेळी ताराराणी पक्षाचे प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सर्जेराव पाटील, नरसिंह पारीख, राहुल घाट, संजय केंगार, अरुण आवळे (तात्या), महावीर कुरुंदवाडे, रमेश पाटील, कोंडीबा दवडते, सुखदेव माळकरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.