काँग्रेसने सर्व जाती धर्मांना एकजूट ठेवले: आमदार मा. राजूबाबा आवळे

हुपरी :प्रतिनिधी

दि .३ जानेवारी:भाजप पक्ष सात वर्षात सर्व सरकारी खाती काही विकून टाकले आहे व काही खाजगीकरण करणार आहेत. भविष्यामध्ये गोरगरिबांच रेशनिंग बंद होणार आहे. भाजपने आतापर्यंत वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेड निर्माण करण्याचे काम केले आहे. असे वक्तव्य आमदार राजू बाबा आवळे यांनी केलं. हुपरी येथील मुस्लिम समाजासाठी निवारा शेड उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. सहारा संस्कृतीक कला क्रीडा मंडळ राजगुरुनगर हुपरी येथे उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार राजू बाबा आवळे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने गेल्या सत्तर वर्षा पासून सर्व जाती धर्माला एकजूट ठेवण्याचे काम केले आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. हुपरीत दोन ते अडीच कोटी निधी आत्तापर्यंत खर्च केलेला आहे. माझ्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त निधी आणून मतदार संघातील सर्व काही कामे करणार आहे. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. अशी त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मानसिंगराव देसाई, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रमजान धुडुभाई, मौला मुल्लानी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुका उपाध्यक्ष किरणराव पोतदार, काँग्रेसचे शहर सचिव प्रा. किरण भोसले, शब्बीर कलावंत, अनिल म्हातुगडे, गजानन पडवळ, शब्बीर मुल्ला, धर्मवीर कांबळे, शौकत जमादार, पत्रकार मुबारक शेख, अल्लाउद्दीन मुल्ला, शहाबुद्दीन घुडुभाई, दिलावर तांबोळी, शमशुद्दीन सनदी, मुस्लिम समाज बांधव व नागरीक उपस्थित होते.