उद्योग जगतातील एक दिग्गज पाउल.. दिवसाला दीडशे टन उत्पादन.सुसज्ज लॅब, कच्च्या मालाची परीक्षण चाचण्यातून निवड, ऑनलाइन प्रोसेसकंट्रोल.. आकर्षक पॅकेजिंग.. ऑर्डर, बिलिंग ते वितरकांपर्यंत प्रॉडक्टपोहोचवण्याचे अचूक व्यवस्थापन.. बेकरी सारख्या बेभरवशाच्या उद्योगात
SAP वर्ल्ड स्टॅंडर्ड सिस्टीम मधून कंट्रोल… आधुनिक तंत्रज्ञान, जागतिकदर्जाची मशीन.. गुणवत्तापूर्ण स्वादिष्ट व रुचकर पदार्थांची मालिका..पदार्थाच्या दर्जा नियंत्रणासाठीची खास माणसं.. असा अनुभव समृद्ध..विशाल विस्तार… म्हणजेच चकोते ब्रँड.शुन्यातून विश्व निर्माण करण्याबरोबरच निर्माण केलेलं विश्व चिरकालटिकवून ठेवणारा उद्योजक स्वत:चा ‘ब्रॅण्ड’ ठरवतो. स्वत:ची ओळख स्वत:चनिर्माण करुन ती ओळख तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवतो.नांदणीतील ‘चकोते उद्योग समुह’ हा त्यापैकीच एक नामांकित ‘ब्रॅण्ड’.आण्णासाहेब चकोते यांनी शुन्यातून निर्माण केलेला हा ‘ब्रॅण्ड’ सध्याप्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. एका शेडमध्ये या उद्योगाचीमुहुर्तमेढ रोवली` गेली आणि आण्णासाहेबांच्या जिद्द, चिकाटीच्या जोरावरया उद्योगाने खऱ्या अर्थाने गगनभरारी घेतली.
1991 साली शाळेची भट्टी लागली… अन स्वप्नांचा श्रीगणेशा झालासावकारी कर्ज घेऊन 20×20 च्या खोलीत लाकडी भट्टी व सायकल वरूनसुरू झालेल्या व्यवसाय अद्ययावत नांदणी, लातूर युनिट मधीलत्पादनाच्या माध्यमातून अल्पावधीतच लाखो ग्राहकांच्या मनावर राज्यगाजवू लागला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्रप्रदेश मधील गावागावात,घराघरात पोहोचला. पहिल्या दिवशी रु ७०० विक्री व ५०००० रु.कर्जापासून सुरु झालेला उद्योग कोट्यवधींची गुंतवणूक असणाऱ्या नवीनप्रकल्पाच्या उभारणी पर्यंत पोहोचला.नवीन प्रकल्पाची संकल्पना व त्याच्या उभारणीची आखणी.एक्सपोर्टच्या माध्यमातून भारतीय चवीला असणारी मागणीत्याचप्रमाणे त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी व मानांकने यांचा अभ्यासहीकेला तसेच बदलत्या जीवनशैलीनुसार मॉडर्न ट्रेड, इन्स्टिट्यूशनल सेल्स,होरेका या डिव्हिजन्स मधील संधी त्यांनी टिपल्याया बाजारपेठेचे भान ठेवून जागतिक दर्जाची टेक्नॉलॉजी संपूर्णस्वयंचलित उत्पादन सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी लागणारे हायटेकइन्फ्रास्ट्रक्चर असणारा तसेच अधिक उत्पादन क्षमतेच्या नवीन प्रकल्पाचीआखणी आण्णासाहेब चकोते यांनी केली. यासाठी युरोपियन राष्ट्रे, जर्मनी,इटली, जपान, मलेशिया, दुबई, चीन, आधी ठिकाणी जाऊन एक एकमहिनाभर राहून तिथे अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती घेतली, अभ्यास केला.
३ मार्च २०२० मध्ये या प्रकल्पाचा पाया देखील घातला. दरम्यान कोरोनासारखी जागतिक स्तरावरील महामारीची प्रतिकूल परिस्थिती निर्माणझाली. सगळे जग थांबले मात्र या काळात देखील चकोतेनी प्रकल्पाचे कामसुरूच ठेवले. अनेक अडीअडचणींना तोंड देत मशीन्स आयात केलीदेशातील व लोकल आपल्या टीमला घेऊन अचूक प्रयोगशीलतेमुळे याप्रकल्पाला पूर्णत्वास नेले. या काळात निर्माण झालेली स्वच्छता व सुरक्षेचेनियमाचे पालन करणारे ब्रँडेड प्रॉडक्टची गरजेची संधी आण्णासाहेबांनीओळखली.
चव व गुणवत्ता यासाठी आग्रही
आपण तयार केलेला प्रॉडक्ट ग्राहकांना पसंतीस उतरला पाहिजे यासाठीआण्णासाहेब चकोते यांचा आतील जातीवंत बेकर नेहमीच कार्यरत असतो,पदार्थांच्या मूळ रंग, पोत, माऊथ फिलिंग मध्ये तडजोड कधीच मान्य करतनाहीत, त्यामुळे त्यासाठी लागणारे उच्चप्रतीचे FSSAI नियमांचे पालनकरून फुड स्टॅंडर्ड प्रमाणेच रॉ मटेरियल ची चोखंदळ निवड केली जाते,तसेच त्याची प्रोसेस यावर परीक्षण करून नियंत्रण केले जाते.ग्राहकांचीआवड निवड लक्षात घेऊन प्रॉडक्ट बनवण्याच्या कलेत आण्णासाहेब चकोते
हे पारंगत आहेत. एखाद्या सुगरणी प्रमाणे आपल्या प्रत्येक प्रॉडक्ट उत्तमचअसला पाहिजे यासाठी ते आग्रही असतात त्यांची हीच आवड त्यांना त्यांच्याव्यवसायात यशस्वी बनवते. या प्रकल्पामध्ये प्रॉडक्ट व मशिनरीचा मेळघालत बेकरीचा खराखुरा अरोमा जो काळाच्या ओघात प्रिझर्व्हेटिव्हज् च्यअतिरिक्त वापरामुळे लुप्त होत होता, तोच पारंपारिक भट्टीतून भाजलेल्याप्रॉडक्टचा अरोमा नवीन प्रगत टेक्नॉलॉजीद्वारे देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्नकेले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातप्रसिद्ध असणारी पारंपरिक कोल्हापुरी शाही खाद्य संस्कृतीला जपणारीनमकीन उत्पादन देखील आपली ओळख निर्माण करतील हा विश्वासआण्णासाहेब चकोते यांना आहे.ग्राहंकाची आवड निवड लक्षात घेऊन त्यांचे अभिप्रायाप्रमाणे नवीनप्रयोग करत पदार्थांमध्ये बदल करणे, स्पर्धकांपेक्षा काय वेगळे देता येईल यासोबतच आपला प्रॉडक्ट मूळ पारंपरिक चव कायम ठेवून ग्राहकापर्यंतपोहोचवणे यावर आण्णासाहेब चकोते सतत कार्यरत असतात. कच्च्यामालापासून रंग, पोत, आकाराने डोळ्यांना आनंद देणारे, जिभेवररेंगाळणारे उत्कृष्ट पदार्थ बनवणेची आवड असली पाहिजे. पदार्थ स्वतःलाप्रथम आवडला तरच तो इतरांनाही आवडतो. पण त्यासाठी त्या रेसिपीमध्येआत्मा ओतावा लागतो तरच उत्कृष्ट पदार्थाची निर्मिती होते आणि एकदा कालोक आपण तयार केलेल्या पदार्थांशी जोडले गेले की ते परत बदलत नाहीतहा विश्वास अनुभवाअंती आण्णासाहेब चकोते यांना वाटतो. अर्थातच मोठ्याप्रमाणावर उत्पादन करत असताना लागणाऱ्या अन्न परीक्षण, त्यासाठीलागणारे वातावरण, तंत्रज्ञान या सर्वाचा गाढ अभ्यास ही त्यांनी केला आहे.व्यवसाय करत असताना आपली संस्कृती निर्माण करणं ही महत्वाचीबाब आहे. मग ती कामाची, प्रेम व आपुलकीची, जबाबदारीची, असो किंवापदार्थाच्या दर्जा गुणवत्ता याबद्दल जागरूकता असो… ही संस्कृती वाढवणं वटिकवणं हे एखाद्या उत्तम उद्योगातच होऊ शकतो असे आण्णासाहेब यांचेमत आहे ही संस्कृती रुजवल्याचे चित्र गणेश बेकरीतील प्रत्येक व्यक्तीमध्येपहावयास मिळतो. हीच संस्कृती त्यांच्या पुढील पिढीने देखील आत्मसातकेलेली दिसते. आण्णासाहेबांनी आपल्या मुलांवरही हे संस्कार घडवलेआहेत. मुलगी ऋतुजा,मुलगा अभिषेक व भाचे शुभम हे फुड टेक्नॉलॉजीच्यापदवी लंडन, न्यूझीलंड या देशातून घेऊन आपल्या गावातील नवीनप्कल्पांमध्ये आपापली जबाबदारी सांभाळत आहेत.हीसंस्कृतीरुजवण्याचेआण्णासाहेबांच्या संपूर्ण कुटुंबाचा देखील वाटा आहे. नेतृत्व करणाऱ्याआण्णासाहेबांनी मोठ्या कुटुंबात प्रेम व आपलेपण जपले.आधुनिक तंत्रज्ञान वापरून ऊर्जा संवर्धनप्रॉडक्टच्या गुणवत्तेबरोबरच टेक्नॉलॉजीचा वापर करताना डायरेक्टफायर्ड ओव्हनच्या माध्यमातून जवळजवळ २०-२५ % एनर्जी वाचवलीतसेच त्या अनुषंगाने पावर सेव्हिंग करण्यात यशस्वी ते झाले. तसेच एकमेगावॅट चा सोलर प्रोजेक्ट उभारून देखील ४० % पर्यंत पॉवर सेव्हिंग सुद्धाया प्रकल्पाद्वारे होत आहे. उत्तम अद्यावत रचनेच्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळेहायजिन मेन्टेन होईल तसेच बाहेरील कन्टामिनेशन प्रतिबंधित करण्यातआले आहे. सांडपाण्याचा प्रकिया प्रकल्पाचा सुद्धा समावेश या प्रकल्पामध्येआहे. पफ पॅनलचा वापर करून क्लायमेट कंट्रोल प्रत्येक युनिटमध्ये करण्यातआले आहे. यामुळे मर्यादित स्वरूपातच उपलब्ध असणाऱ्या संसाधनापेक्षासौर, वारा यासारख्या अक्षय संसाधनाचा वापर कसा वाढवता येईलयासाठी आण्णासाहेब चकोते प्रयोगशील आहेत.
नविन प्रकल्पाची उत्पादन क्षमता
या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ब्रेड विभाग १,००,००० लोप्स, टोस्ट १८टन, केक ५,७५,००० नग, बटर-बन ५,००,००० नग आणि नमकीनविभागांमध्ये पोटॅटो चिप्स १० टन, कुरकुरे व फ्राईम्स १० टन, मूग डाळ१० टन, भडंग १० टन, चिवडा व फरसाण ४० टन अशी संपूर्ण मिळून१५० टन प्रति दिन झाली आहे. या क्षमतेचा हा प्रकल्प १३ एकर जागेत२.५० लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे.जागतिक दर्जाचे या प्रकल्प मध्ये ISO २२००० व HACCP ची तशीचUSFDA , हलाल यासारख्या मानकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.यामुळे सर्वोत्तम गुणवत्ता प्रणालीची अंमलबजावणी होईल. या प्रकल्पातीलस्वच्छता, सुरक्षा, प्रक्रिया व व्यवसाय व्यवस्थापन प्रणालीची उत्तम आणिविश्वासार्ह प्रक्रिया पाहण्यासाठी सर्वांसाठी व्हिजिटर गॅलरी देखील लवकरचसुरू होत आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचानवा बेंचमार्क सेट करेल यात शंकाच नाही.
सातत्य आणि प्रयोगशीलता
चकोते ग्रुप आता सात ते आठ राज्यात मर्यादित न राहता देशाच्या सीमाओलांडून जागतिक बाजारपेठेत आपले वर्चस्व सिद्ध करणेसाठी सज्ज झालेआहेत. उत्पादन, विपणन, वितरणाचा समन्वय साधत चकोते यांनी एकालघुउद्योगाचा बघता बघता आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवला आहे. कॉलिटी,कॉन्टिटी व कॉस्टिंग या त्रीसूत्राच्या जोरावर ग्राहकांमध्ये चकोते प्रॉडक्टअतूट विश्वासार्हता निर्माण केली आहे. याच विश्वासार्हतेला टिकवत आकर्षकव पदार्थांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकणाऱ्या पॅकेजिंग मध्ये स्वच्छता, सुरक्षाव प्रोसेस मधील FSSAI ची मानकांचे पालन करत बनवलेली उत्कृष्टगुणवत्तेची रुचकर स्वादिष्ट पदार्थांची प्रीमियम रेंज बेकरी व नमकीन मध्ये लॉन्च केली आहे. ही नवीन रेंज आपल्या ब्रँडला घराघरापर्यंत पोहोचवेलअसा विश्वास चकोतेंना आहे. सातत्याने प्रयत्न, नवे प्रयोग, लोकांच्या चवीचाअचूक अंदाज याबरोबर कठोर मेहनत, अभ्यास, तंत्रज्ञान व बदल यामुळेचलोकप्रिय ब्रँड झाला आहे. बेकरी उत्पादने म्हटले की प्लास्टिक पिशवीतीललूज मिळणारे उत्पादने डोळ्यासमोर यायची पण या बेकरी पदार्थांनाग्लॅमर देणारा शेफ… चकोते यांनी या उत्पादनांना दर्जा, पॅकेजिंग, न्यूट्रिशनव्हॅल्यू, किंमत, जाहिराती, नवीन वितरणाच्या संकल्पना यामध्येआधुनिकीकरण केले. पारंपरिक व्यवसायाला औद्योगिकीकरणाचे स्वरूपदिले. हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेयांना ब्रँड अँबेसिडर म्हणून ऑन बोर्ड केले. ब्रँड अँबेसिडर असणारी चकोतेही भारतातील पहिली ब्रेड कंपनी ठरली. भविष्यातील नवे उद्योजक तसेचअनेक पारंपारिक उद्योजकांना, आंत्रप्रिनर्सना हा प्रकल्प आण्णासाहेब चकोतेयांची चिकाटी कष्ट अभ्यासूवृत्ती सातत्य व नव्या संकल्पनांचा अवलंब यागोष्टी नक्कीच आदर्शवत ठरतील.