आम आदमी पक्षाचे माजी आमदार देवींदर सिंह शेरावत यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

नवी दिल्ली:प्रतिनिधि

दि:२८: मे:#दिल्लीतील आम आदमी पक्षाचे माजी आमदार देवींदर सिंह शेरावत तसेच दिल्लीतील ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष राजेंद्र सोनी आणि दिल्लीतील १०८ फुटी संकट मोचन धाम मंदिराचे मुख्य महंत सूरज गिरी यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, तसेच शिवसेनेचे दिल्लीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.