रत्नागिरी:प्रतिनिधि
दि:२४:जुन:आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित असून, विरोधकांच्या या बैठकीवर आणि ठाकरे मेहबुबा मुफ्तींच्या शेजारी बसण्यावरून शिवसेनेची मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
उदय सामंत म्हणालेकी, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर घेतलेल्या भूमिकेला विसंगत भूमिका उबाठा गट घेत आहे. उध्दव ठाकरे हे बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत प्रतारणा करत आहेत. बाळासाहेबांनी पाया घातलेल्या भूमिकेशी तडजोड करुन केवळ सत्ता आणि वारसदारांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्याला महत्त्व देत असल्याची टीका शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली
370 कलम हटवणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आपल्याला एक दिवस पंतप्रधान केले तर 370 कलम हटवू असा त्यांनी सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे हे स्वप्न साकार केले. मात्र उध्दव ठाकरे 370 कलम नहटवण्याची मागणी करणा-यांच्या बाजूला जावून बसले. हे राज्याचे व देशाचे दुर्देव आहे. त्याचे उत्तर ठाकरे यांना राज्याला द्यावेच लागेल. उध्दव ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी उदय सामंत यांनी केली.