जयंत पाटलांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काढलं

प्रफुल्ल पटेलांची मोठी कारवाई

मुंबई:प्रतिनीधी

दि:०३:जुलै:राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांविरोधातच खेळी केली आहे. आज पत्रकार परिषेदत घेऊन त्यांनी ही माहिती दिली

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रेदशाध्यक्ष होते. तर, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे अजित पवारांसह गेलेल्या प्रफुल्ल पटेलांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांची नियुक्ती केली आहे.